मंदीरात चोरी करणारे दोन चोरट्यांना युनीट २ ने केले जेरबंद,उपनगर येथील गुन्हा उघड…
नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ ने विहितगांव येथील आण्णा गणपती मंदिरातील चोरीचा गुन्हा उघड करुन दोन चोरट्यांना केले जेरबंद…..
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी, तसेच मंदिरातील चोरी व इतर चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व प्रतिबंध घालणे बाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुन्हेशाखेला आदेशीत केले होते
त्या अनुषंगाने दिनांक. २४/०९/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट २ चे सफौ शंकर काळे, विलास गांगुर्डे, पोहवा प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली की, साजीद खान व पप्पु फाजगे यांनी विहितगांव येथील आण्णा गणपती मंदिरातील दानपेट्या फोडुन चोरी केली असुन सदर इसम विहितगांव विटभट्टी जवळील, दशक्रिया विधी शेड, येथे सुट्टे पैसे नोटांमध्ये रूपांतरीत करून घेण्यासाठी सोबत बाळगुन आहेत अशा खात्रीशिर माहीती मिळाल्याने सदरची बातमी गुन्हे शाखा युनीट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितली असता त्यांनी खात्रीकरून कारवाई करण्याचे आदेश दिले
त्यानुसार त्यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी. पोउनि अजय पगारे, सफौ शंकर काळे, विलास गांगुर्डे, बाळु शेळके, पोहवा प्रकाश भालेराव यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री केली असता १) साजीद हसन खान, वय-२७ वर्ष, रा. विहितगांव विठठल मंदिराजवळ, ता. जि. नाशिक. २) फ्रान्सीस उर्फ पप्पु लाजरस फाजगे, वय-३५ वर्ष, रा. रोकडोबा वाडी, काकडेगल्ली, देवळाली गांव, नाशिकरोड हे मुददेमाला सह मिळुन आल्याने त्यांना जागीच ताब्यात घेवुन त्यांचे कडे आण्णा गणपती येथील चोरी बाबत विचारपुस करता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली तसेच १) उपनगर पो. स्टे गुरनं-३२७/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम-३३१ (४), ३०५ (अ), ३ (५) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयाची कबुली दिली त्यांचे कडुन एकुन ४,३९८/- रू किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपींना पुढील तपास कामी उपनगर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उप आयुक्त, गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे संदीप मिटके यांचे आदेशाने गुन्हे शाखा युनीट २ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे, श्रेणी. पोउनि अजय पगारे, सपोउपनिरी बाळु शेळके, शंकरकाळे, विलास गांगुर्डे, राजेंद्र घुमरे, पोहवा प्रकाश भालेराव, सुनिल आहेर, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, अतुल पाटील, नितीन फुलमाळी, पोशि प्रवीण वानखेडे, संजय पोटींदे यांनी केली