
दुसर्याच्या कारची नंबर प्लेट लाऊन फिरणारे गंगापुर पोलिसांचे ताब्यात…
दुसर्याच्या कारची नंबर प्लेट आपले बी.एम.डब्ल्यु कारला लावुन फिरणारे दोन आरोपींना गंगापुर पोलिसांनी केले जेरबंद….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत राहणारे सचिन दिलीप गुळवे, रा. वरदआय बंगला, सहदेवनगर,गंगापुर रोड, नाशिक यांनी त्यांचे वापराकरीता मर्सीडीज कार क्र. एम. एच. १५ जे.एस. ८००० ही
घेतलेली आहे. परंतु दि. ०५/०४/२०२४ रोजी तक्रारदार हे त्यांच्या कारसह घरी असतांना त्यांचे मोबाईलवर ट्राफिक पोलिसांचे दंडाचे तीन चालान पेंडींग असल्याचे मॅसेज आले.


तसेच दि.०५/०४/२०२४ ते १४/०४/२०२४ दरम्यान तक्रारदार यांच्या कारच्या फास्ट टॅग अकाउंट वरून टोलनाका फी कट झाल्याचे चार मॅसेज आले. सदर बाबत तक्रारदार यांनी ट्राफिक ऑफिस व घोटी टोलनाका येथे चौकशी केली असता तक्रारदार यांची मर्सीडीज कारचा एम. एच. १५ जे. एस. ८००० हा नंबर वापरून दुसरीच बी. एम.डब्ल्यु. कार फिरत असल्याचे दिसुन आले.

म्हणुन तक्रारदार यांनी दि. १८/०४/२०२४ रोजी गंगापुर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्यावरून गंगापुर पोलीस ठाणे येथे । गुरनं.
९२/२०२४ भादंवि कलम ४१७, ४१९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर गंगापुर पोलिसांनी घोटी टोलनाका येथे बनावट नंबर वापरणा-या कार बाबत माहिती दिली होती.त्यानुसार एम. एच. १५ जे. एस. ८००० या नंबरची बी. एम. डब्ल्यु कार पुन्हा घोटी टोलनाका
येथुन पास झाल्याचे आढळुन आल्याने गंगापुर पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोउनि मोतीलाल पाटील यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत घोटी येथुन एक बी. एम. डब्ल्यु कार क्र. एम. एच. १५ ई. एस. ८००० हीचेसह इसम नामे १) जुनेद इब्राहिम शेख रा. लॅमरोड, विहीतगाव नाका, नाशिकरोड, २) सरफराज अल्ताफ कुरेशी रा. शांतीपार्क, उपनगर, नाशिक यांना ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी संदिप कर्णिक,पोलिस आयुक्त, नाशिक शहर,
किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परि – १, प्रशांत बच्छाव पोलिस उपायुक्त (गुन्हे) सहायक पोलिस आयुक्त सिध्देश्वर धुमाळ डॉ सिताराम कोल्हे सहायक पोलिस आयुक्त(गुन्हे) यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गंगापुर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे, पोउनि मोतीलाल पाटील,पोशि गोरख साळुंके, साबळे,मच्छिंद्र वाकचौरे, रमेश गोसावी यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मपोउनि नेहा सोळंके व पोशिशिवम साबळे हे करीत आहेत


