
अंगावर पेट्रोल ओतुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट १ ने तात्काळ घेतले ताब्यात….
ठक्कर बाजार येथे इसमास पेट्रोल ओतुन जाळणा-या आरोपीस तात्काळ गुन्हेशाखा युनिट १ ने घेतले ताब्यात….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०७:३० वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्टॅण्ड येथील सुलभ शौचालयाचे कामकाज पाहणारा विजय इलमचंद गेहलोत व तेथील परिसरात राहणारा शुभम जगताप यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून शुभम जगताप याने विजय गेहलोत याचे अंगावर पेट्रोलची पिशवी फेकुन हॅप्पी होली म्हणत लाईटरच्या सहाय्याने आग पेटवुन विजय गेहलोत यास गंभीर जखमी केले होते. त्यावरून फिर्यादीची पत्नी निशा विजय गेहलोत यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिस ठाणे येथे। गु.र.नं. ८८/२०२५ भा. न्या.सं. कलम १०९ प्रमाणे दि.२२ मार्च २०२५ रोजी ०२:४५ वाजता नोंद करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणनेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त(गुन्हे). प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त संदिप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचे घटनास्थळास गुन्हेशाखा युनिट ०१ चे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देवुन गुन्हयातील पाहीजे आरोपीची माहीती काढत असतांना पोहवा प्रदिप म्हसदे,संदिप भांड यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी शुभम जगताप हा गोल्फ कल्ब ईदगा मैदान परिसरात फिरत आहे.

अशा गोपनीय माहीती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना देवुन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोउनि चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, रविंद्र यांचे पथक तयार केले व नमूद पथकाने गोल्फ कल्ब ईदगा मैदान, नाशिक येथे सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी शुभम सतिश जगताप, वय-२२वर्षे, रा-खाकी आखाडा नाकचौक पंचवटी नाशिक सध्या रा-ठक्कर बाजार, नाशिक हा मिळुन आल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्हया बाबत विचारपुस करता त्याने सांगितले की, मी सुलभ शौचालयाच्या बाजुला असणा-या मीटर बॉक्सच्या रूममध्ये राहत होतो. तेथे काही दिवसापासुन मला विजय गेहलोत हा जाणुन बुजून चेष्ट्रा मस्करी करून काही एक कारण नसतांना मारहाण करीत होता व मला त्या ठिकाणी राहण्यास मज्जाव करून हाकलून देत होता. त्या त्रासाला कंटाळुन मी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नमुद आरोपीतास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव सहा पोलिस आयुक्त गुन्हेशाखा संदीप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, पोउनि चेतन श्रीवंत,सुदाम सांगळे, रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, विशाल काठे, नापोशि विशाल देवरे, पोशि अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, चालक पोशि समाधान पवार यांनी केली


