
नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ची धडाकेबाज कामगिरी…
नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने रेकॉर्डवरील २ अट्टल सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चैनस्नेचिंगचे २० गुन्हे व मोटारसायकल चोरीचा ०१, घरफोडी ०१ असे एकुण २२ गुन्हे उघड करून एकुण १८,११,८००/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत….,
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर आयुक्तालय हद्दीत सतत घडत असलेले चैनस्नेचिंगचे गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही करुन सदर गुन्हयातील इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सदर कार्यवाही बाबत पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त(गुन्हे शाखा) संदिप मिटके, यांनी कारवाई करणेबाबत गुन्हेशाखा युनिट १ यांना मार्गदर्शन केले होते.


त्यानुसार गुन्हे शाखा युनीट १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी गुन्हेशाखा युनिट १ येथील पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा महेश साळुंके, पोअंमलदार आप्पा पानवळ, मुक्तार शेख,राम बर्डे,राहुल पालखेडे, चालक पोहवा सुकाम पठार यांचे पथक तयार करून चैन स्नॅतिंगचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार पोउनि चेतन श्रीवंत व त्यांचे पथक यांनी नाशिक शहरातील चैनस्नेचिंग झालेल्या ठिकाणांची पाहणी करून तेथील सी. सी.टी.व्ही फुटेज व सपोनि हेमंत तोडकर, पोहवा महेश साळुंके व पोअंमलदार राहुल पालखेडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सराईत आरोपी किरण छगन सोनवणे, योगेश गायकवाड व त्यांचा साथीदार यांनी केल्याचे निषपन्न केले

त्याअनुषंग्यने मुन्हेशाखा युनिट १ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे सराईत आरोपींता शोध घेत असतांना यातील योगेश गायकवाड हा सिन्नरफाटा येथे काळया रंगाच्या विनानंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलवर येणार अशी गोपनीय माहीती पोउनि चेतन श्रीवंत व पथक यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली सदरची बातमी वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना देवुन त्यांनी गुन्हेशाखा युनिट १ चे पथक तयार करून सदर आरोपीस ताब्यात घेवुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नमुद पथक हे सिन्नरफाटा मार्केट यार्ड समोर सापळा लावुन थांबले असतांना काळया रंगाच्या विना नंबर प्लेट गाडीवरील इसम येतांना दिसताव त्यास स्टाफचे मदतीने जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाय योगेश दत्तु गायकवाड,वय २८ वर्ष,रा. सिन्नर जि नाशिक असे सांगीतले यावरुन त्यास अटक करुन भद्राकाली पोलिस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले तेथील गुरनं રૂ૧૨/૨૦૨૪ भान्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हयात त्यास अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास पोलिस कस्टडी मंजुर केली.

पोलिस कस्टडी दरम्यान आरोपी योगेश गायकवाड याने त्याचे साथीदार किरण सोनवणे हा असल्याचे सांगितल्याने त्यास देखील मध्यवती कारागृह नाशिकरोड, नाशिक येथुन ताब्यात घेवुन नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली व त्यांना मा. न्यायालयात पोलीस कस्टडी मिळणेकामी हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीतांना दिनांक १६/१२/२०२४ पावेतो पोलीस कस्टडी मंजुर केली.दोन्ही आरोपीतांकडे गुन्हेशाखा युनिट १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्याचा वापर करून चौकशी करून नाशिक शहरातील २० चैनस्नेचिंगचे गुन्हे व १ मोटार सायकल चोरीचा गुन्हा, ०१ घरफोडीचा गुन्हा असे एकुण २२ गुन्हे उघडकीस आणुन त्यावेकडून २२ तोळे सोन्याची लगड, ७०,०००/- रूपये किंमतीची मोटार सायकल, ३०,५००/- रूपये किंमतीची देशी बनावटीची पिस्टल व राऊंड, इतर मुददेमाल असा एकुण १८,११,८००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत.त्याचप्रमाणे आरोपी योगेश दत्तु गायकवाड यांचेवर संगमनेर शहर जि. अहमदनगर आणि डामेरा पोलिस ठाणे हैदराबाद येथे एन.डी. पी.एस ऑक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीतांना दिनांक १६/१०/२०२४ रोजी पावेतो पोलीस कस्टडी असुन यातील पाहिजे आरोपीचा शोध गुन्हेशाखा युनिट क १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार घेत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त(गुन्हे शाखा) संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि बेतन श्रीवंत, पो. हवा प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, महेश साळुंके, शरद सोनवणे, उत्तम पवार, रविंद्र आढाव, देविदास ठाकरे, माझीमखान पठाण, धनंजय शिंदे, रोहिदास लिलके, विशाल देवरे, राजेश लोखंडे, पो.शिआप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास बारोस्कर, अमोल कोष्टी, अगेश्वर बोरसे, मपोशि मनिषा सरोदे, अनुजा येलवे, शर्मिला कोकणी, चालक श्रेणीपाउनि किरण शिरसाठ, सुकाम पवार, रामाधान पवार अशांनी केली आहे.


