एकाच नंबरचे दोन मालवाहु ट्रक चालवुन शासनाची फसवनुक करणारा,युनीट १ च्या ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

एकाच नंबरच्या दोन ट्रक चालवुन शासनाची फसवणुक करणारा इसमास गुन्हेशाखा युनिट १ ने घेतले ताब्यात…





नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचंनानुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस  आयुक्त, गुन्हेशाखा संदिप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये अतिरिक्त भार भरून एकाच क्रमांकाचे वाहने चालवुन शासनाची फसवणुक करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.



त्याअनुषंगाने दिनांक ०२/१२/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट   पोहवा नाझीमखान पठाण यांना त्यांचे गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, एकच नंबर लावलेल्या दोन वेगवेगळया आयशर ट्रक मध्ये स्कॅप मटेरीयल भरुन ते दोन आयशर ट्रक एक्स्लो पॉईंट कडुन ग्लॅस्को पॉईंट कडे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची बातमी पोहवा  नाझीमखान पठाण यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक. मधुकर कड यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि चेतन श्रीवंत,पोहवा प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, अमोल कोष्टी व समाधान पवार अशांनी एक्स्लो पॉईंट कडून ग्लॅस्को पॉईंटकडे जाणाऱ्या रोडवर, नाशिक येथे एकाच क्रमांकाच्या दोन आयशर ट्रक मिळून आल्याने आयशर ट्रक क्रमांक एम एच ०४ के. एफ ७११४ वरील चालकास त्याचे नाव गावं विचारले असता त्याने त्याचे नाव अताउल्ला बैतुल्ला चौधरी, राह. घर नं. ३९/३६, विराटनगर, अंबडलिंक रोड, नाशिक असे सांगितले.



त्यास सदर बाबत विचारपुस केले असता त्याने सदर गाडयांमध्ये अतिरिक्त भार भरून त्याचे पैसे वाचविण्याकरीता दोन्ही वाहनांना एकाच क्रमांकाची नंबर प्लेट लावली असल्याचे सांगितले. तेव्हा त्याचे ताब्यातुन २५,००,०००/-रूपये किंमतीच्या दोन एकाच क्रमांकाच्या आयशर ट्रक जप्त करण्यात आल्या आहेत.तसेच सदरच्या इसमाविरूध्द अंबड पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२), ३४१(१), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास अंबड पोलिस ठाणे करीत आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उप-आयुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ वरिष्ठ पोलिस निरीक्षक  मधुकर कड, पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, अमोल कोष्टी व समाधान पवार अशांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!