पिंपरी चिंचवड येथील चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात…
गुंडा विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड येथील फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेडया
नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
मे २०२३ ते दि १६ एप्रिल २०२४ या दरम्यान आरोपी समाधान युवराज बागुल रा. चिंचगव्हाण,ता.चाळीसगाव, जिल्हा जळगाव सध्या रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जिल्हा पुणे याने त्याच्या साधीदाराबरोबर संगनमत करुन ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये वाहन चालक म्हणुन काम करत असतांना सदर वाहनामध्ये डिस्ट्रीब्युटर लोकांना देणे साठी भरलेली एकुण ०८ बॅग प्रत्येक बॅगची किंमत १०,००० रुपये किंमत असलेली असा एकुण ८०,००० रुपये किंमतीचे डेटॉल कंपनीचे प्रॉडक्ट त्यात हार्पिक डेटॉल साबन व इतर वस्तु असलेला माल वाहनातुन चोरी करुन परस्पर कोणास तरी देवुन मालाचा अपहार केला आहे.
सदरचा गुन्हा घडल्या पासुन सदरचा आरोपी हा फरार होता. सदर बाबत महाळुंगे पोलिस ठाणे पिंपरी चिंचवड येथे गु.र.न २५१/२०२४ भा.द.वि ३८१,४०६, ३४ प्रमाणे दिनांक २७/०४/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता, दि.(२८) रोजी गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार अंबड व सातपुर पोलिस स्टेशन हद्दीत टवाळखोरावर कार्यवाही करण्यासाठी पेट्रोलींग करत असतांना पोलिस नायक प्रदिप ठाकरे यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पिंपरी चिंचवड, पुणे येथील फरार आरोपी हा अंबड पोलिस स्टेशन परीसरात असल्याची बातमी मिळाल्याने सदरची बातमी तात्काळ पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांना सांगुन,सह पोलिस आयुक्त(गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली बातमीदाराने सांगीतलेल्या वर्णना प्रमाणे आरोपीस अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील पाथर्डी फाटा येथुन शिताफिने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव, विचारले असता त्याने त्याचे नांव समाधान युवराज बागुल वय ३० रा. माळुंगे ता. चाकण जिल्हा पुणे असे असल्याचे सांगीतले असुन त्याने पिंपरी चिंचवड येथे गुन्हा केल्याची कबुली दिली. व तो आपली ओळख लपवुन अंबड एम. आय. डी. सी येथे काम करत असुन सदरची
माहीती महाळुंगे पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनचे तपासी अंमलदार पोहवा अरुन देवजी शेळके यांना देवुन सदर आरोपीस पुढील तपासकामी त्यांचे ताब्यात दिले आहे
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णीक,पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी,पोलिस उपायुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे,यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सफौ मलंग गुंजाळ, पोलिस अंमलदार डी. के. पवार, राजेश सावकार, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, निवृत्ती माळी, नितिन गौतम प्रविण चव्हाण, गणेश नागरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.