
विमल गुटखा नावाने नकली गुटखा बनविणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी केला पर्दाफाश…
नाशिकरोड पोलिसांनी बोगस गुटखा पॅकिंग करणा-या टोळीचा केला पर्दाफाश,९,४३,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल केला जप्त…



नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त परिमंडळ – २, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त नाशिकरोड विभाग, नाशिक डॅा सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतुक करणेसाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला गुटखा पानमसाला विक्री करणारे व उत्पादन करणारे यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने नाशिकरोड पोलिस ठाणे कडील सपोनि सुखदेव काळे व त्यांचे सोबतचे पथक यांनी नाशिकरोड पोलिस ठाणे हददीत शोध सुरू केला होता. दि. १६/०३/२०२४ रोजी सपोनि एस. जी. काळे, यांना गोपनीय बातमी मिळाली की, काही इसम अवैध्यरित्या गुटखा पॅकिंगचे मशिन व पॅकिंगचे साहीत्य तसेच कच्चा माल सुभाषरोड, नाशिकरोड, नाशिक येथून एक महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी मध्ये घेवुन जात आहेत. त्या अनुषंगाने रामदास राजाराम शेळके वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी पथक तयार करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. सपोनि सुखदेव काळे व गुन्हे शोध पथकामधील पोलिस अंमलदार यांनी बातमी प्रमाणे कारवाई करून सदर गाडी व गाडी मधील इसमांचा पाठलाग करून वालदेवी नदीचे पुलावर विहीतगाव कडे जाणारे रोडवर, नाशिकरोड, नाशिक येथे दि. १६/०३/२०२४ रोजी ११:३० वा. पकडले असता त्यांना त्यांची नावे विचारली त्यांनी त्यांची नावे

१) रमीन उर्फ अनहर रियान सैय्यद वय ३० वर्ष रा. मन्सुरी चाळ, गोसावीवाडी नाशिकरोड, नाशिक
२) मोहम्मद अख्तर रजा वय २८ वर्ष रा. जमदाड चौक, मनमाड, नांदगाव, नाशिक ३) ताबिश इरफान शेख वय २० वर्ष रा. सरदार पटेल रोड, मनमाड, नांदगाव, नाशिक
४) शोएब इम्तियान पठाण वय २० वर्ष रा. नमदाड चौक, मनमाड, नांदगाव, नाशिक
५) सुरन शिवपुजन राजभर वय २९ वर्ष रा. नमदाड चौक, मनमाड, नांदगाव, नाशिक
६) रोहीत संजय वाकुंन वय २६ वर्ष रा. भाबड वस्ती, मनमाड,
बांदगाव, नाशिक
असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडुन महींद्रा कंपनीची पिकअप गाडी, त्यामध्ये गुटखा पॅकिंगचे मशिन व कच्चा तयार गुटखा तसेच सदर माल पॅकींग करण्याचे विमल पान मसाला नावचे पॅकेट रोल असे साहीत्य मिळुन आले. असा एकुन ९,४३,००० /- रूपये किंमतीचा माल मिळुन आला. या सर्व आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांचे विरोधात पोलिस स्टेशन नाशिक रोड येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे तसेच आरोपी नामे रमीन उर्फ अजहर रियान सैय्यद याचेवर यापुर्वी नाशिकरोड पोलिस ठाणेस गुरनं १४०/२०२४
भादंवि क. ३२८ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त परिमंडळ – २, मोनिका राऊत,सहायक पोलिस आयुक्त नाशिकरोड विभाग, नाशिक डॅा सचिन बारी आणि नाशिकरोड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास राजाराम शेळके, पोनि बडे नाईकवाडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे
सपोनि एस. जी. काळे, पोहवा विष्णु गोसावी, पोहवा विजय टेमगर, नापोशि संध्या कांबळे,पोशि नाना पानसरे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, मनोहर कोळी, कल्पेश जाधव, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, रोहीत शिंदे, प्रमोद ढाकणे महेंद्र जाधव, गोकुळ कासार,योगेश रानडे यांनी केली


