
विक्रीकरीता गांजाची साठवणुक करणारा युनीट १ च्या तावडीत सापडला…
अवैधपणे विक्रीकरीता गांजाची साठवणुक करणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगारास ,गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद….
नाशिक(शहर प्रतिनिधी )- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, यांनी नाशिक शहरामध्ये चोरुन गांजा, एम.डी विक्री करणा-या इसमांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत कडक सुचना दिलेल्या होत्या


त्या अनुषंगाने दि. ०८/०४/२०२४ रोजी गुन्हे शाखा, युनीट १, नाशिक शहर कडील नेमणुकीस असलेले पोहवा विशाल काठे यांना गोपनीय माहीती मिळाली की अंबड लिंकरोड येथील फ्लोरा टाउन पद्मश्री रो हाउस क्रमांक १२ यामध्ये यश उर्फ बाज्या पाटील नावाचा इसम याने गांजाची विक्री करण्यासाठी साठवणुक केली आहे अशी बातमी मिळाल्याने सदरची माहीती वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना कळविली असता त्यांनी पोउपनि श्रीवंत,रविंद्र बागुल,
पोहवा विशाल काठे,प्रविण वाघमारे,संदिप भांड, नाझीमखान पठाण,नापोशि प्रशांत मरकड,विशाल देवरे,पोशि आप्पा पानवळ, चापोशि समाधान पवार यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर ठिकाणी जावुन सदर इसमाच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरझडतीत त्याने गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता साठवणुक करून ठेवलेला असल्याने इसम नामे यश उर्फ बाज्या राजेंद्र पाटील, वय २५ वर्षे, रा. रो ! हाउस १२, फ्लोरा फाउंटन अंबडलिंकरोड नाशिक यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन ११ किलो
६५० ग्रॅम गांजा तसेच मोबाईल असा एकुण १,४९,८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर आरोपी विरुध्द अंबड पोलिस ठाणे येथे एन. डी. पी. एस. कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १
नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत नागरे, पोउनि चेतन श्रीवंत,रविंद्र बागुल, सपोनि सुरेश माळोदे, वसंत पांडव, पोहवा विशाल काठे, प्रविण वाघमारे, संदिप भांड,नाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, नापोशि प्रशांत मरकड, विशाल देवरे,
मिलींदसिंग परदेशी,पोशि आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, अनिरूदध येवले, राजेश राठोड, विलास चारोस्कर,मपोशि अनुजा येलवे, चासपोउनि किरण शिरसाठ,पोशि समाधान पवार यांनी केली



