नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने गांजा बाळगणार्यास ताब्यात घेऊन जप्त केला २८ किलो गांजा…
अवैधरित्या विक्रीसाठी अंमली पदार्थ गांजाची साठवणुक करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट १ ने ताब्यात घेऊन,४,२१,७२५ रूपये किंमतीचा २८.११५ किलो ग्रॅम गांजा केला जप्त…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस आयुक्त.संदिप कर्णिक यांनी नाशिक शहरा मध्ये अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना दिलेल्या होत्या. पोलिस उपायुक्त(गुन्हे) चंद्रकांत खांडवी,सहा पोलिस आयुक्त(गुन्हे) डॅा सिताराम कोल्हे, यांनी मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने दि. २८/०५/२०२४ रोजी गुन्हे शाखा, युनीट १, मधील पोलिस शिपाई मुक्तार शेख यांना गोपनीय माहीती मिळाली की, शाहरुख शहा याने म्हाडा वसाहत बिल्डींग नं. अ- ८ पाचवा
मजला, वडाळागांव, नाशिक येथे अवैधरित्या गांज्याची विक्री करण्यासाठी गांज्याची साठवणुक करून ठेवलेली आहे
अशी बातमी मिळाल्यावरून वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, सफौ सुरेश माळोदे, पोहवा रमेश कोळी, महेश साळुंके, देविदास ठाकरे, नाझीमखान पठाण धनंजय शिंदे,पोशि आप्पा पानवळ, राजेश राठोड, मुक्तार शेख, विलास चारोस्कर, मपोशि अनुजा येलवे यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर ठिकाणी जावुन सदर इसमाचा शोध घेवुन तो मिळुन आल्याने त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव शाहरुख शहा रफीक शहा, वय २९ वर्षे, रा. मेहबुबनगर, वडाळागांव, नाशिक असे सांगुन त्याचेकडे अंमली पदार्थाबाबत विचारपुस करून त्याने दिलेल्या माहिती नुसार त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरामध्ये २८ किलो ११५ ग्रॅम गांजा नावाचा अंमली पदार्थ व मोबाईल फोन असा एकुण
४,३१,७२५/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर आरोपीताविरूध्द इंदिरानगर पोलिस स्टेशन येथे एन. डी. पी. एस. कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक ,प्रभारी पोलिस उपायुक्त(गुन्हे) चंद्रकांत खांडवी,सहा. पोलिस आयुक्त,(गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट. १ चे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत,सफौ सुरेश माळोदे, पोहवा रमेश कोळी, महेश साळुंके, देविदास ठाकरे, नाझीमखान पठाण, धनंजय शिंदे,पोशि मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राजेश राठोड, विलास चारोस्कर, समाधान पवार मपोशि अनुजा येलवे अशांनी केलेली आहे.