नाशिक रोड पोलिसांचा MD ड्रग बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल पुरवठा करणाऱ्या कारखाण्यावर छापा…
नाशिक: मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी MD Drugs वर मोठी
कारवाई केल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनाही जाग आली
असून त्यांनीही ड्रग्स साठी लागणारा कच्च्यामालाच्या गोडाऊनवर
छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. शिंदे गाव परिसरात
ड्रग्जसाठी कच्चामाल पुरविणाऱ्या एका गोडाऊन वर नाशिक
रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं छापा टाकला असून या छाप्यात करोडो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोनच दिवसापूर्वी मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी शिंदे एमआयडीसी परिसराचा असलेल्या ड्रग्ज बनवणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकला होता. या छाप्यात करोडो रुपयांचे अंमली पदार्थ व ड्रग जप्त करण्यात आले होते. तसेच काही मशिनरीसुद्धा जप्त करण्यात आल्या होत्या. सदरचा कारखाना हा ड्रग माफिया ललित पाटील व त्याचा भाऊ भूषण पाटील हा चालवित होता. दरम्यान ड्रग्जसाठीचा कच्चा माल पुरविणाऱ्या गोडाऊनवर नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकून करोडो रुपयाचा कच्चामाल जप्त केला आहे. या गोडाऊनवरून काही प्रमाणात अंमली पदार्थ सुद्धा असल्याचे समजते. सध्या नाशिकरोड पोलिसांचे पथक घटनास्थळी ठाण मांडून बसलेले आहे. या छाप्यामुळे ड्रग्जबाबत अधिक धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.