
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन,१७ तोळे सोने व नगदी २.५ लाख केले जप्त…
बा-हे गावात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार,स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने व रोख २.८० लाख रू. हस्तगत….


नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळचे सुमारास बार्हे येथील रहिवासी सुनिल राऊत यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की यांचे घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात आरोपीने बेडरूमधीत कपाटातील व देवघरातील संदुकामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण १३,७६,७७५/- रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. सदर बाबत बा-हे पोलिस ठाणे येथे गुरनं १०३/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांनी जिल्हा अभिलेखावरील मालाविरूध्दचे नाउघड गुन्हे उघडकीस आणणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि किशोर जोशी व बा-हे पो.स्टे. चे सपोनि सोपान राखोंडे यांनी वरील गुन्हयातील आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती घेतली असता, सदर गुन्हयातील आरोपी हा नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असल्याचे खात्रीशीररित्या समजले.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरातील नांदुरनाका परिसरात सापळा रचुन सराईत गुन्हेगार अरूण अंकुश दाभाडे, वय ५२, रा. कोळीवाडा, साईनाथ नगर, नांदुरनाका, नाशिक यास ताब्यात घेतले. सदर आरोपीस विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता, त्याने वरील घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.सदर आरोपीस बा-हे पोलिस ठाणेकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्याची दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे.
सदर आरोपीचे कब्जातुन वरील गुन्हयात चोरून नेलेले १६८.२५० ग्रॅम (सुमारे १७ तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने किं. रू. ४,११,७७५/- व रोख रक्कम २,८०,६३५/- असा एकुण ६,९२,४१०/- रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असुन त्याचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे,यातील आरोपी अरूण अंकुश दाभाडे, याचेविरूध्द यापुर्वी १) भद्रकाली पो.स्टे. नाशिक शहर गुरनं १६/१९९६ भादवि कलम ४५४,५११ २) नाशिकरोड पो.स्टे. नाशिक शहर गुरनं ३३३/१९९२ भादवि कलम ३७९ ३) पिंपळगाव पो.स्टे. गुरनं १३१/१९९५ भादवि कलम ४५४,३८० ४) कळवण पो.स्टे. गुरनं ६४/२००४ भादवि कलम ४५४,४५७,३८० ५) पंचवटी पो.स्टे. नाशिक शहर गुरनं ३१०६/२००५ मु.पो.का.क. १२२(क)६) इगतपुरी पो.स्टे. गुरनं ३३/२०१० भादवि कलम ४५४, ३८० ६ ७) सुरगाणा पो.स्टे. गुरनं ३५/२०२० भादवि कलम ४५४, ३८० ईतके गु्न्हे नोंद आहेत
सदरची कामगीरी ही नाशिक ग्रामीन पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि किशोर जोशी, सपोनि संदेश पवार, बा-हे पो.स्टे. चे सपोनि सोपान राखोंडे, तसेच स्थागुशाचे सफौ शिवाजी ठोंबरे, नवनाथ सानप, पोहवा किशोर खराटे, सचिन देसले, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, संदिप नागपुरे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विनोद टिळे, हेमंत गरूड, मनोज सानप, योगिता काकड, ललिता शिरसाठ, तसेच अमोल गांगुर्डे, शैलेश गांगुर्डे, कुणाल वैष्णव, तृप्ती पवार, प्रजक्ता सोनवणे यांचे पथकाने वरील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.


