स्थानिक गुन्हे शाखेने एका संशईतास ताब्यात घेऊन,उघड केले चोरी,जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण यांनी एका संशईतास ताब्यात घेऊन उघड केले,४ जबरी चोरी,१ घरफोडी,शेतीपंपाचे गुन्हे,१० आरोपींना केले जेरबंद…

नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीत रावळगाव या ठिकाणी एच. पी. पेट्रोलपंपावरील जमा असलेली रोख रक्कमेचा बँकेत भरणा करण्याकरीता जात असतांना पेट्रोलपंपावरील मॅनेजर फिर्यादी भिमा रावन पाटील यास अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन रोख रुपये 5,34,700/- जबरीने लुटून नेले या जबरी चोरी प्रकरणी गुरनं, 106/2023 कलम 394, 341, 34 भांद. वि. तसेच सन 2024 मध्ये सुध्दा अशाचप्रकारे रोख रुपये 6,59,430/- जबरी चोरी प्रकरणी गुरनं. 233/2024 कलम 392, 341, 34 भा.दं.वि. अन्वये वडनेर खाकुर्डी पोलिस ठाणेस गुन्हे दाखल आहेत.





त्याच बरोबर मागील तीन ते चार महिन्यापूर्वी भायगांव शिवारात ग्रामीण भागातील महिला बचत गटाचे पैसे गोळा करुन बँकेत भरणा करण्याकरिता जात असलेल्या अन्नपुर्णा फायनान्स कंपनीचा मॅनेजर तेजस सिरसाठ यास  वेगवेगळ्या अज्ञात तीन ते चार अज्ञात ईसमांनी मोटर सायकलवर पाठलाग करुन त्यांना रस्त्यात अडवुन कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे ताब्यातून रुपये 64.818/- रक्कम असलेली बॅग बळजबरीने चोरी केली या बाबत गुरनं. 305/2024 कलम 304 (२). भा.न्या. सं. अशाचप्रकारे कुकाणे परिसरातील अन्य गुन्ह्यात रोख रुपये 55,600/- असलेली बंग जबरी चोरी प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेस गुरनं. 333/2024 कलम 304 (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हे दाखल आहेत. त्याच बरोबर वडगांव शिवारात घरफोडी बाबत गुरनं, 39/2024 कलम 457, 380 भा.दं.वि. अन्वये घरफोडी करुन रुपये 71,500/- चा ऐवज चोरी केलेबाबत गुन्हा दाखल आहे. तसेच स्थानिक शेतक-याच्या शेतीकरिता लावलेल्या पाण्याच्या मोटारी चोरीस गेलेबाबत अनेक घटना घडलेल्या आहेत.याअनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक, मालेगांव  अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी, नितीन गणापुरे यांनी वरिल घटनांचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांना गुन्हे उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या.



त्यानुसार पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा राजु सुर्वे, पोउनि, दत्ता कांभिरे व पथक यांनी केलेल्या समांतर तपासात गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत, गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरुन स्थागुशाचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे व त्यांचे पथक यांनी गोपनीय माहिती काढून सदरचे गुन्हे सराईत गुन्हेगार महेंद्र मधुकर सोनवणे रा. काष्टी ता. मालेगांव, जि. नाशिक व विशाल सुभाष पवार रा. सेक्शन बी मालेगांव यास निष्पन्न करुन त्याने त्याचे वेगवेगळ्या साथीदारांसह मिळून केलेले असल्याची खात्रीशीर मिळालेल्या बातमीवरुन त्यांना सुरुवातीस अग्नीशस्रासह ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काष्टी, कुकाणे ता. मालेगांव व मालेगांव कॅम्प, पंचशिलनगर, जाजुवाडी या परिसरातून खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे.१) महेंद्र मधुकर सोनवणे, वय 22 वर्षे, रा. काष्टी ता. मालेगांव, (कुकाणे व भायगांव शिवार बंग लिप्टींग व घरफोडी) २) दिनेश उर्फ डेविल नंद पवार, वय 20 वर्षे, रा. मालेगांव कॅम्प, सिधी कलनी, (रावळगांव पेट्रोलपंप, भायगांव शिवार बंग लिप्टींग व घरफोडी) ३) विशाल सुभाष पवार, वय 20 वर्षे, रा. पाचडिव्हीजन, सेक्शन बी, ता. मालेगांव (रावळगांव पेट्रोलपंप, कुकाणे व भायगांव शिवार बंग लिप्टींग) ४) तुषार उर्फ काळ्या आप्पा मोहिते, वय 19 रा. पंचशोलनगर, मालेगांव कॅम्प, (कुकाणे बॅग लिप्टींग) ५) अक्षय मधुकर खरे, वय 23, रा. पंचशिलनगर, मालेगांव कॅम्प, (कुकाणे बॅग लिप्टींग) ६) अरुण दत्तु सोनवणे, वय 24 रा. कुकाणे ता. मालेगांव (कुकाणे बॅग लिप्टीग) ७) दिपक धर्मराज गुजरे, वय 21, रा. जाजूवाडी हनुमान मंदिराजवळ, मालेगांव (रावळगांव पेट्रोलपंप) ८) अनिकेत कनैय्या गवळी, वय 22 रा. मालेगांव कॅम्प, श्रीकृष्णनगर, (रावळगांव पेट्रोलपंप) ९) जितु आखाडे पवार, वय 19, रा. कुकाणे ता. मालेगांव (कुकाणे बॅग लिप्टींग) १०) राहुल संजय खैरनार, वय 23 रा. काष्टी ता. मालेगांव (कुकाणे बॅग लिप्टींग)



सदर आरोपींना वरिल गुन्ह्याचे तपासात चौकशी केली असता महेंद्र मधुकर सोनवणे रा. काष्टी याने त्याचे साथीदार यांचेसह महिला बचत गटाचे पैसे जमा करणारे इसम यांचा मोटर सायकलवर कुकाणे, भायगांव परिसरातून पाठलाग करुन त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचेकडुन बळजबरीने बॅगमधील रोख रक्कम हिसकावून घेवून पळून गेले असल्याची कबुली दिली आहे. तसेच दिपक धर्मराज गुजरे, अनिकेत गवळी, विशाल पवार, दिनेश पवार यांनी रावळगांव परिसरातून पेट्रोलपंपाचे पैसे भरणार करणारे इसमाचा पाठलाग करुन त्यास कोयत्याचा धाक दाखवुन रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली असल्याची कबुली दिली आहे. तसेच शेतक-यांच्या पाण्याच्या मोटारी चोरी प्रकरणी अरुण सोनवणे याने कबुली दिली आहे. आरोपी विशाल पवार याचे कब्जातुन त्याने विनापरवाना जवळ बाळगलेला एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे (राऊंड) व एक धारदार तलवार व कोयता हस्तगत करण्यात आला आहे. असून त्याचेविरुध्द भा.ह.का. अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तसेच दिनेश पवार व जितु पवार याचेकडुन त्याने गुन्ह्यात वापरलेला एक धारदार कोयता व एक खंजीर हस्तगत करण्यात आला. तसेच वरिल गुन्हा करण्यासाठी आरोपीताने वापरलेल्या ०३ मोटर सायकल व ०६ मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत.

यामधील आरोपी  विशाल पवार याचे विरुध्द यापूर्वी ०२ मारामारीचे, महेंद्र सोनवणे याचेविरुध्द ०२ जबरी चोरी व एक विनयभंग व पोक्सो तसेच दिनेश उर्फ डेविल पवार याचेविरुध्द जबरी चोरीचा ०१ व राहुल खैरनार याचे विरुध्द ०२ मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींना पुढील तपासकामी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाणेस हजर करण्यात आले आहे. वरिल सर्व आरोपींकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक, मालेगांव अनिकेत भारती व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, पोलिस उपनिरीक्षक दत्ता कॉभिरे, स्थागुशाचे पोलिस अंमलदार पो. हवा. गिरीष निकुंभ, सुभाष चोपडा, शरद मोगल, नापोशि नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पो.हवा. हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम तसेच वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, पोलिस उपनिरीक्षक, नवले,पोशि. गजानन कासार यांचे पथकाने वरिल जबरी चोरीचे ०४ गुन्हे व घरफोडीचा ०१ व पाण्याची मोटर चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपीताकडून ०१ अग्नीशा, ०२ जिवंत काडतुस, ०१ तलवार, ०२ कोयते, ०१ खंजीर, ०३ मोटर सायकल, ०६ मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केलेला आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!