
पाथरे येथील घरफोडीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,२५ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…
वावी पोलिस ठाणे हद्दीत घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा करुन गुन्हयातील चोरीस गेलेले मुद्देमालासह ६ आरोपींना केले जेरबंद, २५ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत….


नाशिक(ग्रामिण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वावी पोलिस ठाणे हद्दीत दि. ३१/०३/२०२४ रोजी फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे, वय २३ यांचे पाथरे बु, ,ता. सिन्नर, जि. नाशिक येथील राहते घरी दुपारचे सुमारास बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात
इसमांनी घरफोडी करून लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेले प्रकरणी वावी पोलिस ठाणे येथे गुरनं १४२/२०२४ भादवि कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोकॉ विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून केलेल्या तांत्रिक तपासात खालील नमुद आरोपींचा सहभाग असल्याचे
निष्पन्न झाले आहे.
१) सुनिल शंकर म्हस्के, वय ३१, रा. साबरवाडी, ता. येवला, जि. नाशिक २) चांगदेव भागीनाथ देवडे, वय ३५, रा. बदापुर, ता. येवला, जि. नाशिक ३) कैलास शिवाजी मढवई, वय ३४, रा. चिचोंडी, ता. येवला, जि. नाशिक ४) अकरम कमरूद्दीन शेख, वय ३१, रा. विंचुर रोड, येवला, ता. येवला, जि. नाशिक ५) जीवन वाल्मीक कोल्हे, वय २६, रा. हडप सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक ६) अलका दिपक जेजुरकर, वय ४८, रा. येवला, ता. येवला, जि. नाशिक

यांना निष्पन्न करुन वरील नमुद आरोपींकडून गुन्हयात चोरून नेलेले रोख रक्कमेतील १४ लाख ७ हजार रूपये, गुन्हयात चोरीस गेलेले सर्व दागिने व चोरीचे पैशातुन खरेदी केलेला ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारूती इर्टिगा कार क्र. एच. एच. ०४.ई.टी. ७८९५ व इटींगा कार क्र. एम.एच. १४.क्यु. एक्स. ४३९९ अशा दोन चारचाकी असा एकुण २५ लाख रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

यातील आरोपीतांकडे गुन्हयाचे तपासात चौकशी केली असता, यातील फिर्यादी मयुरेश काळे व आरोपी क्र. ६ अलका जेजुरकर हे
एकमेकांना ओळखत असुन फिर्यादीचे घरी तिचे येणे जाणे होते वरील नमुद रक्कम व दागिने असलेबाबत व ते कुठे ठेवले आहे हे आरोपी क्र. ६ अलका जेजुरकर हिस माहित होते. घटनेच्या दिवशी यातील आरोपी क्र. १ सुनील म्हस्के व आरोपी क्र ६ अलका जेजुरकर यांनी फिर्यादी मयुरेश काळे यास शिर्डी येथे खरेदीसाठी सोबत नेल्यानंतर आरोपी क्र. २ ते ५ यांनी फिर्यादीचे राहते घराची टेहाळणी करून दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून,घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने असा लाखोंचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी वावी पोलिस ठाणेस हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलिस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि नाना शिरोळे, पोलिस अंमलदार नवनाथ सानप, विश्वनाथ काकड, विनोद टिळे, मेघराज जाधव, उदय
पाठक, संदिप नागपुरे, हेमंत गरूड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गिरीष बागुल, चालक विकी म्हसदे,महिला पोलिस अंमलदार योगिता काकड, छाया गायकवाड, अस्मिता मढवई यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.


