
मालेगाव शहरातील खुन प्रकरणातील मुख्य आरोपीस २ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….
मालेगाव शहरातील युवकाचे खुन प्रकरणातील मुख्य आरोपीस
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मनमाड शहरातून दोन तासाचे आत घेतले ताब्यात…..


नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५) रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव छावणी पोलिस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक नामे रफिक खान अन्वर खान, रा. संगमेश्वर, मालेगाव हा त्याचे दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमानीच्या बाजुला उभा असतांना, त्याचा मित्र रफिक शहा अमिन शहा उर्फ लम्बा रफिक व त्याचेसोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळुन, मागील भांडणाची कुरापत काढून युवक नामे रफिक खान यास शिवीगाळ करून, कोणत्यातरी धारदार हत्याराने त्याचे डोक्यावर, हातावर व मांडीवर वार करून जिवानिशी ठार मारले

याबाबत मालेगाव छावणी पोलिस ठाणे येथे गुरनं ११७ / २०२४ भादवि कलम ३०२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपींनी पलायन केले होते.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक मालेगाव. अनिकेत भारती, सहा. पोलिस अधीक्षक तेघबीरसिंग संधु, सहा. पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी, यातील आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी मालेगाव छावणी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास आदेशित केले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता, यातील मुख्य आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक हा मनमाडच्या दिशेने एका दुचाकीवर जात असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून
स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातून सदर खुनाचे गुन्हयातील मुख्य आरोपी रफिक शहा अमिन शहा उर्फ लम्बा रफिक, वय २८, रा. संगमेश्वर, मालेगाव यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्याने त्याचा साथीदार फैसल पुर्ण नाव माहित नाही याचेसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक यास मालेगाव छावणी पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले असून त्याचा साथीदार फैसल याचा पोलिस पथक शोध घेत आहे. यातील आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक याने गुन्हा घडल्यानंतर मालेगावातून पलायन केले होते, त्यास स्थागुशाचे पथकाने दोन तासांचे आत ताब्यात घेऊन त्याचेकडून वापरलेली होण्डा युनिकॉर्न मोटर सायकल देखील हस्तगत केली आहे.
सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, सहा. पोलिस अधीक्षक तेघबीरसिंग संधु, सहा. पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि संदिप पाटील, पोहवा चेतन संवत्सरकर, नापोशि शरद मोगल, योगेश कोळी, विशाल आव्हाड,हेमंत गिलबिले प्रदिप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांचे पथकाने सदर खुनाचे गुन्हयातील आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.


