
महागड्या दुचाकी चोरणारे दोघांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने २० दुचाकी केल्या हस्तगत…
महागड्या मोटरसायकल चोरी करणारे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…


नाशिक (प्रतिनिधी) – महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषभ आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफिने अटक करून चोरीच्या २० मोटरसायकल ह्या जप्त केल्या आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते . त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकाने जिल्हयातील अतिदुर्गम भागांमध्ये मोटर सायकल चोरी करणा-या आरोपींना ताब्यात घेवुन कारवाई केली आहे.

(दि.१८) जुन रोजी घोटी पोलिस ठाणे हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातुन दोन मोटर सायकल चोरी गेल्याबाबत घोटी पो.स्टे. गुरनं ३०४/२०२४ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोशि प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वाळुंज एम.आय.डी.सी. परिसरातुन आरोपी १) पृथ्वीराज भोलेश्वर जंगम, (वय १९), रा.घोटी, ता.इगतपुरी यास ताब्यात घेवुन वरील गुन्हयात अटक करण्यात आली. सदर आरोपीने त्याचे साथीदारांसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्याचे कब्जातुन चोरीच्या अॅक्सेस मोपेड व टीव्हीएस स्टार या मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहे. सदर आरोपीस विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदारांसह आणखी मोटर सायकली चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचे समांतर तपासात आरोपी २) राजेश दगडु मोहरे, (वय २५), रा.फुलवडे, ता.आंबेगाव, जि.पुणे सध्या म्हाळुंगे एम.आय.डी.सी., जि.पुणे यास रात्रभर पाळत ठेवून शिताफिने ताब्यात घेतले आहे. यातील ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी पृथ्वीराज जंगम व राजेश मोहरे यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार (विधीसंघर्षित) यांचेसह नाशिक जिल्हयातील घोटी, इगतपुरी, वाडीव-हे, सिन्नर, तसेच ठाणे जिल्हयातील शहापुर, खडकपाडा, आणि पुणे जिल्हयातील आंबेठाण, म्हाळुंगे एम.आय.डी.सी., आळेफाटा, मंचर या ठिकाणांवरून महागडया मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटर सायकल चोरीचे ०९ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास यश आले आहे.
यातील आरोपीचे कब्जातुन चोरीच्या २० मोटर सायकल किंमत रु. १४ लाख २५ हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपींना घोटी पो.स्टे. गुरनं ३०४/२०२४ भादवि कलम ३७९ या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आंतरजिल्हयामध्ये मोटर सायकल चोरी करणारे आरोपींचे रॅकेट उघडकीस आणून कारवाई केली असून सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, घोटी पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, स्थागुशाचे सपोनि गणेश शिंदे, पोशि विनोद टिळे, प्रकाश कासार, संदिप झाल्टे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, घोटी पो.स्टे. चे पोहवा लक्ष्मण धकाते, योगेश यंदे यांचे पथकाने मोटरसायकल चोरीचे ०९ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.


