
मुंबई येथे जाणारी गुटख्याची खेप स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने पकडली….
स्थानिक गुन्हे शाखेने घोटी टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह २७ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत….
घोटी(नाशिक प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे नाशिक ग्रामीण पोलिसांची जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई सुरू आहे.


त्याअनुषंगाने दिनांक ०५/१०/२०२४ रोजी पहाटेचे सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयीत इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करून विक्री करण्याचे उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका परिसरात छापा टाकून, टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.०३.डी.व्ही. ७७९१ यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे इसम १) अली हसन गुलाम हुसेन, वय २५, रा. बनियाखुर्द, ता.बासी, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश, ह. मु. गोवंडी, शिवाजीनगर, ठाणे, २) मेहताब इबरार अली, वय २२, रा. हरैया, ता. बासी, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले. सदर इसम हे चोरटया रितीने गुटख्याची वाहतुक करतांना मिळून आले असुन त्यांचे कब्जातून वारानसी आशिक व शुध्द प्लस सिल्व्हर सुगंधीत गुटख्याचा ७,५०,९२०/- रूपये किंमतीचा अवैध गुटखा व टाटा ट्रक क्रमांक एम.एच.०३.डी. व्ही. ७७९१ असा एकुण २७,५०,९२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील ताब्यात घेतलेले इसम हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठयास प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत/स्वादीष्ट तंबाखू, पानमसाला, सुगंधीत स्वादीष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहे, हे माहिती असतांना देखील स्वतः चे फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगातांना मिळून आले असून त्यांचेविरूध्द घोटी पोलिस ठाणे येथे गुरनं ४५५/२०२४ भा.न्या.सं. कलम १२३,२७४,२७५,३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, पोलीस अंमलदार प्रकाश कासार, विनोद टिळे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले यांनी सदरची कारवाई केली आहे.
गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या असून, याकामी पोलीसांकडून सत्वर कारवाई करण्यात येणार आहे.


