भारत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडुन पेट्रोल डिझेलची चोरी करणारी टोळी मनमाड शहर पोलिसांनी केली जेरबंद….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मुंबई-मनमाड-बिजवासन उच्च दाब भुमिगत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडुन पेट्रोलियम पदार्थाची चोरी करणाऱ्या टोळीस मनमाडर शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड…

नाशिक(प्रतिनिधि) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,बी.पी.सी. एल. इन्टॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक श्री. अनुज नितीन धर्मराव यांनी मनमाड शहर पोलिस स्टेशन येथे  तक्रार दिली की  मनमाड शहर पोलिस स्चेशन हद्दीतुन अनकवाडे शिवारात ता. नांदगाव जि. नाशिक येथे मुंबई- मनमाड-बिजवासन पाईपलाईन चैनेज (सी.एच) २४३.३०० किमी.पेट्रोल-डिझेल ची पाईपलाईन जाते ती फोडुन पाईप लाईनला क्लॅम्प बसवून छिद्र करुन पेट्रोल डिझेलची चोरी करुन त्याची  विक्री करण्याचे उद्देशाने केल्याबाबत दि.०६ मे २०२५ रोजी प्रकार उघडकिस आल्याने पोलिस स्टेशन मनमाड शहर येथे  गुरनं. २७६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ कलम ३०२ (२), ६१(२) पेट्रोलियम आणि खनिज वाहक नळ (जमीन वापरणाऱ्याचे हक्क संपादन करणे) अधिनियम १९६२ चे कलम १५, १६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.







सदर गुन्ह्याचे तपासात मनमाड शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय मा. करे, यांनी तपास अधिकारी म्हणून पोलिस पथक तयार करुन त्यांना तपासाबाबत योग्य सुचना देऊन तसेच गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहीतीच्या आधारे आरोपीची माहीती काढून आरोपी १) सुनिल उर्फ सोनु जयशंकर तिवारी, वय ३५ वर्ष, रा. काका ढाब्याजवळ, कल्याण ता. जि. ठाणे, २) कथ्रायन उर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार, वय ३८ वर्ष, रा. म्हाडा कॉलनी, गौतम नगर, गोवंडी, मुंबई यांना काकासाहेब शिवराम गरुड यांचे पोल्ट्री फॉर्म जवळ अनकवाडे शिवारातुन शिताफीने पकडून दि. ०५/०६/२०२५ रोजी १०.०३ वाजता अटक केली तसेच यातील आरोपी क्र  ३) मोहम्मद मकसूद अब्दुल वाहीद शेख, वय ४० वर्ष, रा. मदरसा स्कुल, रुम नं. ८-२० संजय नगर भाग-२ शिवाजीनगर गोवंडी मुंबई यास मुंबई येथे ताब्यात घेतले आहे. ४) इरफान वाकुब मोमीन, रा. इंडीयन हायस्कुल जवळ, जमधाडे चौक, मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक, ५) काकासाहेब शिवराम गरुड, रा. अनकवाडे ता. नांदगाव जि. नाशिक मनमाड येथुन ताब्यात घेऊन दि. १० जुन २०२५ रोजी ३.३२ वा. अटक केली आहे. तसेच आरोपी क्र ६) वाहीद सदार सैय्यद, रा. नटवर पारखे कंपाऊन्ड, बिल्डींग नं. १०/१, रुम नं. ७१०, घाटकोपर लिग रोड, इंडीयन ऑईल नगर, गोवंडी मुंबई. ७) याकुब शेख  ज्याचे नांव गाव माहीत नाही. ८) अमजद कुरेशी, रा. मुंबई यांची नांवे निष्पन्न झाली आहेत. सदर गुन्ह्यात आजपावेतो एकुण ८ आरोपी निष्पन्न झाले असुन ५ आरोपीना अटक करण्यात आलेली आहे.



सदर गुन्ह्यातील आरोपी क्र १ सुनील उर्फ सोनु जयशंकर तिवारी, वय ३५ वर्ष हा सराईत गुन्हेगार असुन, त्याचेवर खालील प्रमाणे विविध पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहे.१) शाहु नगर पोलीस स्टेशन मुंबई २) बान्द्रा कुर्ला कॉम्पलेक्स पोलीस स्टेशन तसेच यातील आरोपी क्र ४  इरफान याकुब मोमीन हा सुध्दा सराईत गुन्हेगार असुन याचेवर सुध्दा विविध पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहे.१) मनमाड शहर २) निफाड येथे गुन्हे नोंद आहेत



सदर गुन्ह्यात अटक केलेले आरोपी मुंबई-मनमाड-बिजवासन पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र करुन क्लॅम्प व जी.आय. पाईप व्हॉल्वसह बसवुन यांनी नेमका किती पेट्रोलियम पदार्थ चोरी करण्यात आला. व कोणास विकला तसेच कोणत्या टँकरमधुन वाहतुक केली तसेच आणखीन किती ठिकाणी अशाच प्रकारे चोरी करण्यात आली आहे. याबाबत अधिकचा तपास सुरु आहे

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलिस अधिक्षक मालेगाव तेघबीर सिंह संधू, उपविभागीय पोलिस अधिकारी, मनमाड बाजीराव महाजन  यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय मा. करे पोलीस स्टेशन मनमाड शहर सपोनि कौशलरामनिरंजन वाघ, पोहवा राजेंद्र केदारे, पंकज देवकाते प्रल्हाद सानप,अशोक व्यापारे,पोशि  संदीप झाल्टे,रणजित चव्हाण, राजेंद्र खैरणार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोहवा हेमंत गिलबिले,नापोशि प्रदिप बहीरम यांनी विशेष कामगिरी करुन नमुद गुन्ह्यातील आरोपीस अटक करुन गुन्ह्या उघडकिस आणला





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!