
सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने उघड केला घरफोडीचा गुन्हा…
सटाण्यात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद….
नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२४ जुलै २०२४ रोजी दुपारवे सुमारास सटाणा तालुक्यातील मोराळे पाडा, मानुर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोने व चांदीचे दागिने, मोबाईल फोन असा एकुण ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता. सदर बाबत सटाणा पोलिस स्टेशन येथे गुरनं ५४०/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल होता.


नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील नाउघड मालाविरूध्दवे गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे. त्यानुसार स्थागुशावे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांनी वरील गुन्हयातील आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत व तांत्रिक बाबींची पडताळणी करून मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे पोलिस पथकाने सटाणा तालुक्यातील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार दिगंबर उर्फ अजय महादु नाडेकर, वय २४, रा. मुळाने, ता.सटाणा, जि. नाशिक यास पडघा, जिल्हा ठाणे येथून ताब्यात घेतले आहे.

त्यास विश्वासात घेवुन वरील गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीचे कब्जातुन वरील गुन्हयात चोरीस गेलेला विवो कंपनीचा मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटर सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

यातील आरोपी अजय नाडेकर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी सटाणा पोलिस ठाणेस घरफोडीचे दोन, तसेच दंगल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस गुन्हयाचे पुढील तपासकामी सटाणा पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास चालु आहे. सदर आरोपीकडुन घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधिक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, पोउपनि दत्ता कांभीरे, पोहवा सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, संदिप नागपुरे, नापोशि हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, भाउसाहेब टिळे यांचे पथकाने केली आहे.


