अवैध शस्त्र व काडतुससह सिन्नर येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….
सिन्नर शहरात बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र(पिस्तल) बाळगणारे इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुसे केली जप्त….
नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस
अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील सर्व पोलिस ठाणेनिहाय कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सिन्नर शहरात अवैधरित्या घातक
अग्निशस्त्र बाळगणारे इसमावर कारवाई केली आहे.
दि. ०४/०३/२०२४ रोजी अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे, सिन्नर शहरातील हॉटेल शाहु परिसरात एक संशयीत इसम
अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार
यांनी सिन्नर शहरातील हॉटेल शाहु परिसरात सापळा रचुन संशयीत ईसम गणेश लक्ष्मण हाके, वय २६, रा. गोजरे मळा, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक यास ताब्यात घेतले. सदर इसमाची अंगझडती
घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आले. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र बाळगुन मिळून आला असून
त्याचेविरूध्द सिन्नर पोलिस ठाणेस भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरूध्द वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल, तर नजीकचे पोलिस ठाणे येथे संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, पोहवा चेतन संवस्तरकर, प्रविण सानप, हेमंत गरूड, पोशि विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने केली आहे.