
त्रॅबकेश्वर हद्दीत लॅाजवर चालणार्या कुंटनखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…
त्रंबकेश्वर पोलिस ठाणे हद्दीत नाशिक त्रंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील मानस लॅाजिंग बोर्डींग याठिकाणी चालणार्या कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा….


नाशिक(प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२६) रोजी दुपारचे सुमारास त्रंबकेश्वर पोलिस ठाणे हद्दीत नाशिक-त्रंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील मानस लॉजींग व बोडींग येथे कुंटनखाना चालत असलेबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांना गोपनीय माहीती मिळाली होती

बातमीदाराकडून मिळाली सदर माहीतीची खात्री करुन
मिळालेल्या माहितीवरून हॉटल मानस व लॉजींग बोर्डींग येथे बनावट ग्राहक पाठवून हॉटल मानस व लॉजींग बोर्डींग येथे छापा टाकला असता एक पिडीत महिला हिची सुटका करून कुंटनखाना चालविणारा दलाल किशोर निवृत्ती शिंदे, रा. खंबाळे, ता. त्रंबकेश्वर यास ताब्यात घेतले असून मानस लॉजींग बोडींग मालक गणेश भिका मोरे, रा. खंबाळे, ता. त्रंबकेश्वर हा फरार आहे. सदर कारवाई वरून त्रंबकेश्वर पोलिस ठाणे गुरनं. ८८/२०२४, कलम ३७०, ३४ भादंवि सह कलम ३, ४, ५, ६ पिटा कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक नाशिक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सहा. पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, पोहवा चेतन
संवस्तरकर, पो.हवा. किशोर खराटे, पो.हवा. सतिष जगताप, पो. हवा. संदिप नागपुरे, नापोशि. विश्वनाथ काकड, पो.शि. कुणाल मोरे, पो.शि. नितीन जाधव, मनापोशि योगीता काकड,महिला पो.शि. छाया गायकवाड, चालक सपोउनि, गोजरे यांचे पथकाने सदरचा छापा टाकुन कारवाई केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायविरोधी अभियान सुरू करून जिल्ह्यात चालणा-या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन
करण्याकामी मोहिम चालु राहिल.


