अवैध शस्त्रासह सराईत गुन्हेगारास LCB ने घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुस सह एकास सिन्नर शहरातुन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

सिन्नर(नाशिक)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील सर्व पोलिस ठाणेनिहाय कडक कारवाई करण्यात येत आहे. त्त्यायानुसार आतापर्यंत अवैध शस्त्राविरोधात ३ गुन्ह्यांत ३ तलवार व २ पिस्टल जप्त करण्यात आल्या





अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दि. ०७/०३/२०२४ रोजी सिन्नर शहरातील आणखी एका इसमावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे.दि. ०७/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांना
मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे, सिन्नर शहरातील डुबेरे रोडवर हॉटेल रुद्रा परिसरात एक संशयीत इसम दहशत पसरविण्याचे उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगतांना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सिन्नर ते डुबेरे रोडवर हॉटेल
रूद्रा परिसरात सापळा रचुन संशयीत नामे ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे, वय ४३ वर्षे, रा. ढोकी
फाटा, काळे मळा, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक यास पाठलाग करून ताब्यात घेतले. सदर इसमाची
अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आले.
सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचेविरूध्द सिन्नर पोलीस ठाणेस गुरनं १६६ / २०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील ताब्यात घेतलेला इसम नामे ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
१) ठाणे नगर पो.स्टे. ठाणे शहर गुरनं २२३ / २०१६ आर्म अॅक्ट ३/२५.
२) सिन्नर पो.स्टे. गुरनं २११/२००६ भादवि कलम ४५२, ३४२, ३२३, ५०६
३) सिन्नर पो.स्टे. गुरनं १११ / २००६ भादवि कलम ४५७, ३८०
४) सिन्नर पो.स्टे. गुरनं ३५३ / २०१४ भादवि कलम ३७९, ३४
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गेल्या ०४ दिवसांपुर्वी देखील सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरातुन अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे इसमास ताब्यात घेवुन कारवाई केली होती. आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरूध्द वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल, तर नजीकचे पोलिस ठाणेस संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक नाशिक
ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, चेतन संवस्तरकर, पोशि विनोद टिळे,
गिरीष बागुल, , हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!