
प्रवासी महीलेस लुटनारे १२ तासाचे आत नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड…
मोहदरी घाटात महिलेची लुटमार करणारे १२ तासाचे आत केले गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिसांची संयुक्तिक कामगिरी…..
सिन्नर(नाशिक)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०७ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीचे सुमारास तळेगाव दिघे, ता. संगमनेर येथील रहिवासी महिला ही नांदुरशिंगोटे येथे जाण्यासाठी एका पांढ-या रंगाचे पिकअप वाहनास हात दाखवुन नाशिकरोड येथुन प्रवासी म्हणून बसली होती. दरम्यान पिकअप वाहनावरील चालक व गाडीतील एक इसम यांनी नाशिक ते पुणे महामार्गावर मोहदरी घाटामध्ये रोडच्या कडेला पिकअप गाडी थांबवुन, यातील प्रवासी महिलेस चाकुसारखे धारदार शस्त्राचा धाक दाखवुन सोने, चांदीचे दागिने, मोबाईल फोन व बॅग असा एकुण १२,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून, सदर महिलेस गाडीचे खाली उतरून लोटुन दिले त्यात तिला दुखापत झाल्याने MIDC सिन्नर पोलिस ठाणे येथे गुरनं ०६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३०९ (६), ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


त्याअनुषंगाने सदरची घटना ही गंभीर स्वरुपाची असल्याने पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांनी सदर घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थागुशाचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे व MIDC सिन्नर पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी सदर गुन्हयातील फिर्यादी यांचेकडे चौकशी करून, यातील अज्ञात आरोपींनी गुन्हयात वापरलेली पिकअप गाडी, तसेच आरोपींचे वर्णन, अंगावरील पेहराव व बोलीभाषा यावरून सदरचे गुन्हेगार हे सिन्नर शहराचे आसपासचे गावातीलच असल्याचा तर्क लावुन तपास सुरू केला. त्यानुसार खब-यांमार्फत गोपनीय माहिती घेवुन, संशयीत १) संदिप विठ्ठल वाघ, वय २८, रा. मापारवाडी, ता. सिन्नर, २) रोहित मधुकर लहाने, वय २४, रा. सोनगिरी, ता. सिन्नर यांना निष्पन्न करुन घेतले. त्यांना विश्वासात घेवुन वरील गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी दोघांनी मिळून नाशिकरोड येथुन एका महिलेस त्यांचेकडील पिकअप गाडीमध्ये प्रवासी म्हणुन बसवुन, मोहदरी घाट परिसरात तीला चाकुचा धाक दाखवुन तिचे अंगावरील सोने व चांदीचे दागिने, मोबाईल व बॅग जबरीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

सदर आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली पिकअप गाडी क्र एम एच १५ जे.सी.८७९१, तसेच जबरीने चोरून नेलेले सोने, चांदीचे दागिने, विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण ९,०९,०००/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास MIDC सिन्नर पोलिस ठाणे येथील सपोनि दिपक सुरवाडकर हे करीत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, MIDC सिन्नर पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, स्थागुशाचे सपोनि संदेश पवार, सफौ नवनाथ सानप, पोलिस अंमलदार विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, रविंद्र गवळी तसेच MIDC सिन्नर पो.स्टे. चे सपोनि दिपक सुरवाडकर, पोउपनि किशोर पाटील, पोहवा भगवान शिंदे, योगेश शिंदे, प्रकाश उंबरकर, जयेश खाडे, प्रशांत सहाणे, नितीन काकड यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेवुन १२ तासांचे आत सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.


