नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडले अवैध धंदे विरोधात विशेष अभियान एकाच दिवशी २५ ठिकाणी छापे ८ लक्ष रु चा माल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नाशिक : . सवीस्तर व्रुत्त असे की  नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक . शहाजी उमाप यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध
व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील दुर्गम भागात छुप्यारित्या सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्टयांवर आज रोजी ग्रामीण पोलिस दलातर्फे
धाडसत्राचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलीसांनी जिल्हयातील विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणा-या एकूण ३२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून सुमारे ८,०९,०००/- रूपये किं. चे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, तयार गावठी दारू व इतर साधन सामुग्री जप्त करून २५ इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली २५ गुन्हे दाखल केले आहेत. या धाडसत्रात जिल्ह्यातील मालेगाव तालुका, सटाणा व अभोणा मधील ४, इगतपुरी व जायखेडा मधील प्रत्येकी ३, वाडीव-हे मधील २, तर त्रंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, नांदगाव, घोटी मधील प्रत्येकी १ ठिकाणांचा समावेश आहे. यात जिल्हयातील डोंगर-द-या, नदी-नाल्यांच्या लगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातभट्ट्यांवर छापे टाकून पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची गावठी दा
नष्ट केली आहे. तसेच देवळा, सिन्नर, वणी, पेठ या पोलिस ठाणे हद्दीतील परंपरागत हातभट्टी गाळप करणा-या ठिकाणांवर देखील छापे टाकण्यात आले, परंतू सदर ठिकाणी काहीही आढळून आले नाही. सदर धाडसत्रात सर्वात जास्त माल घोटी पोलिस ठाणेच्या हद्दीतील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी उमराई माथा परिसरात मिळून आला. सदर ठिकाणी विशेष पथकाने छापा टाकून, त्याठिकाणाहून २०० लिटरचे ४७ प्लॅस्टिक ड्रम व त्यातील एकूण ९४०० लिटर नवसागर व गुळ मिश्रीत रसायन, काळया गुळाची पावडर असलेल्या १७ गोण्या, १४ गुळाच्या भेल्या, ५ किलो नवसागर असा एकूण ४,९२,६००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाईमुळे खैरगाव बीटचे बीट अधिकारी व अंमलदार यांना पोलिस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे.

सदर कारवाईत अपर पोलिस अधीक्षक मालेगाव  अनिकेत भारती यांचेसह ०५ पोलिस उपअधीक्षक, १५ पोलिस निरीक्षक, ३५ सहा. पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षक व सुमारे ४०० पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला होता. जिल्हयातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचावी, या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलिसांनी खबर हेल्पलाईन सुरू केली असून, नागरिकांनी
६२६२ २५ ६३६३ या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या परिसरात चालणा-या अवैध व्यवसायांची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक . शहाजी उमाप यांनी केले आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!