नाशिक पोलिस अधीक्षकांचे पथकाने पकडला ३७८ किलो गांजा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नाशिक जिल्हयातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरून अवैधरित्या गुटखा, अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक,शहाजी उमाप यांचे आदेशान्वये विशेष पथकांची कारवाई केला ३७८ किलो गांजा जप्त…..

नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २५/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर
महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयीत इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस
निरीक्षक  हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून, नाशिकच्या दिशेने येत असलेले इनोव्हा वाहन क्र. एम. एच. २०. सी.यु. ७०७०
थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून नाशिकच्या दिशेने प्रस्थान केले. सदर वाहनाचा पोलिस पथकाने पाठलाग केला, परंतु ते मिळून आले नाही. पोलिसांनी नाशिक बाजूकडे जाणारे मार्गावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करून सदर वाहनाचा शोध घेतलाअसता, नाशिक शहरातील आर.टी.ओ. ऑफिस परिसरातील घुंगरू बारजवळ सदर वाहन बेवारस स्थितीत मिळून आले. सदर वाहनाची झडती घेतली असता, त्यात १२ प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेल्या एकूण १८९ पाकीटांमध्ये सुमारे ३७,८३,२५०/- रूपये किंमतीचा ३७८ किलो ३२५ ग्रॅम गांजा मिळून आला. सदर कारवाईत इनोव्हा वाहन क्र. एम. एच. २०. सी.यु. ७०७० यासह त्यात मिळून आलेला उग्र वासाचा गांजा असा एकूण ६२,९०,२५०/- रूपये किंमतीचा
मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी यातील इनोव्हा वाहनाचा वापरकर्ता व मालक यांनी संगणमत करून सदर वाहनामध्ये मानवी मनावर परिणाम करणारा मादक पदार्थ ३७८ किलो ३२५ ग्रॅम वजनाचा उग्र वासाचा गांजा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक केली तसेच सदरचे वाहन बेवारस स्थितीत सोडून पळून गेले म्हणून त्यांचेविरूध्द सायखेडा पोलिस ठाणे येथे गुरनं २७० / २०२३,
एन.डी.पी.एस. अधिनियम १९८५ चे कलम ८, (क) २० (ब) खंड २ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपींचा विशेष पोलिस पथक कसोशिने शोध घेत असून,
गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि गणेश शिंदे हे करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलिस अधीक्षक  आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  हेमंत पाटील, पथकाचे पोलिस निरीक्षक  संजय गायकवाड, सपोउनि दिपक आहिरे, शांताराम नाठे, पोहवा सचिन धारणकर, चेतन संवत्सरकर, पोशि विनोद टिळे, गिरीष बागुल, चापोना जाधव
यांनी सदरची कारवाई केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!