
कुख्यात गुन्हेगार अमोल साळवेला पिस्टल,मॅक्झीन,जिवंत काडतुसांसह अटक…
कुख्यात गुन्हेगार अमोल साळवेला पिस्टल,मॅक्झीन,जिवंत काडतुसांसह अटक…
पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अति.पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्त स्वप्ना गोरे, सहा पोलिस आयुक्त सचिन हिरे, यांनी वाढत्या गुन्हेगारीस आळा बसावा व गुन्हेगाराकडुन सर्रासपणे होत असलेल्या अग्नीशस्त्राचा वापर व येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अग्नीशस्त्राचा वापर होऊन गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश दिले व सुचना केल्या. त्याप्रमाणे नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारत शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) भोसरी पोलीस ठाणे यांनी वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराविरुध्द कडक कारवाई करण्याबाबत तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलिस उप निरीक्षक मुकेश मोहारे व अमंलदारांना मार्गदर्शन करून त्यांना सुचना दिल्या.


त्या प्रमाणे (दि.०९एप्रिल) रोजी पोलिस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, पोलिस उप-निरीक्षक बालाजी जोनापल्ले, सहा पोलिस फौजदार राकेश बोयणे, पो.हवा खरात, पोना. पोटे, पोना भोजणे, पोशि गोपी, पोशि वराडे, पोशि जाधव असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस स्टेशन यांच्या आदेशान्वये भोसरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत खाजगी वाहनाने भोसरी परिसरात रेकार्डवरील आरोपीचा शोध घेत असताना सहा. पोलिस फौजदार राकेश बोयणे यांना मिळालेल्या माहितीनुसार खुन, मारामारी, आर्म ॲक्ट असे गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी नामे – अमोल फिलीप साळवे, (वय-३० वर्षे), रा.गव्हाणे पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, विठ्ठल दर्शन सोसायटी, फ्लॅट नंबर १९, आळंदी रोड, भोसरी पुणे हा देवकर वस्तीकडे जाणाऱ्या रोडवरून, वाळके यांचे गोठयाकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर भोसरी पुणे येथे पिस्टल सदृश्य हत्यार घेवुन फिरत आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्या प्रमाणे सापळा रचुन सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचेकडुन एकुण ५७,०००/- रूपये अंदाजे किमतीचा एक पिस्टल दोन मॅक्झीनसह व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्या बाबत भोसरी पोलिस स्टेशन गु र नं २४७/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर इसमास नमुद गुन्हयात अटक केली.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालय, अति.पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परिमंडळ १ स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त पिंपरी विभाग सचिन हिरे, नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारत शिंदे पोलिस निरीक्षक (गुन्हे) भोसरी पोलिस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. बालाजी जोनापल्ले, पोउपनि. मुकेश मोहारे, सहा. पोलिस फौजदार राकेश बोयने, पोलिस हवा हेमंत खरात, महिला पोलिस हवालदार प्रतिभा मुळे, पोलिस अंमलदार नवनाथ पोटे, प्रकाश भोजणे, स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, तुषार वराडे, ज्ञानेश्वर साळवे, नुतन कोंडे यांनी केलेली आहे.



