जबरी चोरी करणारा अट्टल चोरटा पाथरी पोलिसांचे ताब्यात..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

जबरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला पाथरी पोलिसांनी केली अटक…

परभणी (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या मुळे पोलिसांनी जलदगतीने तपास करून बारा तासांच्या आत जबरी चोरी करणारा आरोपी- दत्ता सुंदरराव बोरकर, (वय २३ वर्षे), रा.लवुळ, ता.माजलगाव, जि.बीड या अट्टल गुन्हेगाराला मुद्देमालासह शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी अनंता बालासाहेब चिंतामणी, (वय ३२ वर्षे), रा. आदर्श नगर, पाथरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या बाबत सविस्तर वृत्त असे की, दोन अनोळखी इसमांनी संगणमत करून फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर पाळत ठेऊन फिर्यादी चालवत असलेल्या मोटार सायकलला यात नमूद कारचालकाने त्याची कार हायगई व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून कट मारली त्यात फिर्यादी व साक्षीदार खाली पडून गंभीर जखमी झाले त्याचा फायदा घेऊन पाठीमागून मोटार सायकल वरील दोघे अनोळखी येऊन जखमी साक्षीदाराच्या हातात असलेली किमती 8,75,500 किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रुपये असलेली पिशवी बळजबरीने झटका मारून हिसकटून घेऊन यातील कट मारणारा कारचालक व मोटरसायकलस्वार एकाच दिशेने निघून गेले. अशी तक्रार या सदर चोरीच्या अनुषंगाने प्रभारी पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी स्था.गु.शा.चे पथकास सदर गुन्ह्याचा तपास लाऊन आरोपी शोधणे व चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करणे बाबत मार्गदर्शनपर सुचना व आदेश दिले होते.



त्यावरून स्था.गु.शा. चे पथक नेमूण सदर गुन्ह्या संदर्भाने तांत्रीक तपास करण्यात आला व आरोपी निष्पन्न करून सापळा रचून आरोपी क्र.1 व 2 यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदर चोरी केली असल्याचे सांगत असल्याने त्यांच्या ताब्यातून वर नमूद प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपी क्र.1 व 2 यांना व मुद्देमाल व रक्कम पुढील तपासकामी पोलीस ठाणे पाथरी येथे हजर केले आहे.



1) 12.860 ग्रॅम वजनाचे सोन्याचे
दागीने – 77,160/ रु.

2) 4396 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने – 3,25,304/- रु.

3) नगदी – 2000/- रु.

4) मोबाईल – 10,000/ – रु.

5) गुन्ह्यात वापरलेली कार – 6,00,000/-रु.

6) गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल – 60,000/-रु. असा एकूण 10,74,464/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही प्रभारी पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. वसंत चव्हाण, स.पो.नि.पी.डी. भारती, पोउपनि गोपीनाथ वाघमारे, अजीत बिरादार, पोलीस अंमलदार विलास सातपुते, सिद्धेश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नामदेव डूबे, मधुकर ढवळे, राम पौळ, बालासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, सचिन भदर्गे, रंगनाथ दुधाटे, राहुल परसुडे, दिलावर पठाण, परसराम गायकवाड, शेख रफीयोदिन, निलेश परसोडे, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रे वार, कैलास केंद्रे, संजय घुगे ने. स्था.गु.शा.

पोलीस अंमलदार संतोष वाव्हळ, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर ने. सायबर सेल यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!