
कमी पैशात सोन्याचे शिक्के देतो असे सांगुन सराफा व्यापार्यास लुटणार्यास ६ तासाचे आत घेतले ताब्यात….
सराफ व्यापार्याला आमिष दाखवुन लुटणारी टोळी परभणी पोलिसांनी 6 तासात केली गजाआड,8.5 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत….
परभणी(प्रतिनिधी) -,परभणी जिल्ह्यात पोलिस स्टेशन बोरी हद्दीत नकली सोन्याचे शिक्के कमी किंमतीत देतो म्हणून कर्नाटक राज्यातील सराफा व्यापाऱ्याला फसवून मारहान करून सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल घेवून पळून गेलेल्या आरोपींना स्था.गु.शा. व बोरीचे अधिकारी व अंमलदारांचे पथकाने अवघ्या 6 तासांच्या ताब्यात घेवून 8.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 08 जानेवारी 2024 रोजी पोलिस स्टेशन बोरी, ता.जिंतूर हद्दीत दुपारी 03.30 वा चे सुमारास बोरी ते वाघी जाणारे रोडवर असलेल्या सोलार प्लॉटच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत यातील सराफ व्यापारी मारोती कृष्णा कोळेकर, वय 29 वर्षे जात धनगर व्यवसाय सराफा व्यापारी, रा. मोळे, ता. हातणी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक यांना सोन्याचे शिक्के कमी किमतीत देतो असे सांगुन सराफ व्यापारी मारोती कृष्णा कोळेकर यांचा विश्वास संपादन करून साक्षीदारांचे मोबाईल व फिर्यादी व्यापार्याचे नगदी 10,00,000/- रुपये घेवून मारहान करून पळून गेले. त्यावरून पो.स्टे. बोरी, ता.जिंतूर येथे गु.र.नं. 03/2025 कलम 316 (2), 318 (4), 119(1), 2(5) बी.एन.एस. अन्वये अज्ञात आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता

पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी सदर बाबतीचे गांभीर्य ओळखून सदर जबरी चोरीचा तपास करण्याच्या सुचना देऊन पो.स्टे. बोरी व स्था.गु.शा. चे पथके तयार करण्यात आली त्यावरून स्था.गु.शा. चे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील व त्यांचे पथकाने यातील संशईत आरोपी 1)मालनबाई सोमनाथ पवार, वय 73 वर्षे, 2) परमेश्वर गणु शिंदे, वय 74 वर्षे, 3) जगन्नाथ जापान काळे, वय 41 वर्षे तीघे रा. कमलापूर, पोस्ट मजलापूर ता. पुर्णा यांना सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तसेच त्यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेले 8,50,000/- रुपये देखील हस्तगत करून त्यांना पुढील कार्यवाहीस्तव पो.स्टे. बोरी येथे हजर केले.त्याचप्रमाणे पोलिस स्चेशन बोरी येथील स.पो.नि. सुनिल गोपिनवार, पोउपनि सचिन सोनवणे यांचे पथकाने आरोपी 4) अजय धनराज गायकवाड, वय 30 वर्षे, रा.उजनी ता. अहमदपूर, 5) विठ्ठल राम ससाणे, वय 32 वर्षे रा. अहमदपूर, 6) विनोद शेषेराव डांगे वय 28 वर्षे, रा. लोहा यांना कुंभारवाडी परिसरातून ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक. यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,जिंतूर जिवन बेनिवाल यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांचे नेत्रुत्वात स.पो.नि.पी.डी.भारती,सुनील गोपिनवार, पोउपनि अजित बिरादार, चंदनसिंह परिहार सचिन सोनवणे,पोलिस अंमलदार सुग्रिव केंद्रे सिध्देश्वर चोटे, नामदेव डुबे, राम पौळ, जयश्री आव्हाड, संजय घुगे, शंकर गायकवाड, अनिल शिंदे, हरि गायकवाड यांनी केली


