
परभणी स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा १२ तासाचे आत केला उघड….
स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासाचे आत केला उघड आरोपी आटकेत….
परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०९-१५ वा चे सुमारास छत्रपती मेडीकल समोर बस स्टैंड रोड परभणी येथे फिर्यादी कृष्णा नंदकुमार भोसले रा पाथरगव्हाण ता पाथरी जि परभणी हे आय सी यु हॉस्पीटल परभणी येथील नातेवाईकाला भेटण्यासाठी जात असताना ऑटो मध्ये आलेल्या अनोळखी तीन इसमांनी त्याचे जवळील नगदी ४३०००/ रु व एक विवो कंपनीचा मोबाइल हॅन्डसेट जबरीने चोरुन नेला होता सदर प्रकरणी पो स्टे नवामोंढा येथे गुरन क ६०४/२०२४ कलम ३०९ (४), ३ (५) बि एन एस प्रमाणे तिन अज्ञाता विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता,


सदर गुन्हातील आरोपीचा शोथ घेउन गुन्हा उघडकीस आणण्या बाबात पोलिस अधिक्षक रविंन्द्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस निरीक्षक यांना सुचना दिल्या होत्या तसेच सदर गुन्हयाचा समांतर तपास पोलिस स्टेशन नवामोंढा व स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांचे कडुन सुरु असतांना स्था गु शा पथकाला गुप्त बातमीदारा कडुन खात्रीशीर माहीती मिळाली की सदरचा गुन्हा हा हरजीतसिंग विक्रमसिंग जुन्त्री रा विकास नगर गंगाखेड रोड परभणी याने त्याचे साथीदार सोबत मिळून केला आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने स्था गु शा चे पथकाने त्यास ताब्यात घेउन गुन्हा बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार बालाजी उर्फ मुगदाड बाळया पि नामदेव साळवे रा अण्णा भाऊ साठे नगर उड्डाण पुलाजवळ परभणी याने मिळून केल्याचे सांगीतले

सदर आरोपी कडुन गुन्हयातील चोरलेल्या पैश्या पैकी नगदी १३००/ रु थ एक विवो कपंनीचा मोबाइल हॅन्डसेट असा एकुण १४८००/ रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे, सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेउन जप्त मुददेमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही स्तच पोलिस स्टेशन नयामोंढा यांचे ताब्यात देण्यात आले आहे सदर दोन्ही आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे कडुन अजुन गुन्हे उघड होण्याची शक्यत आहे,

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक रविन्द्रसिह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे,उप विभागीय पोलिस अधिकारी परभणी शहर दिनकर डंबाळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहा पोलिस निरीक्षक. पी डी भारती, आर एस मुत्येपोड, पोउपनि अजित बिरादार, पोलिस अंमलदार मधुकर चटटे, सुग्रीव केंन्द्रे,रवी जाधव, शेख रुफीयोददीन, निलेश परसोडे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे


