चोरीस गेलेल्या कार सह आरोपीस एक तासाच्या आत मुद्देमालासह केली अटक,परभणी स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

परभणी ः सवीस्तर व्रुत्त असे कीदिनांक 08/10/2023 रोजी रात्री 10.00 वा. मानवत रोड येथून घरा समोर उभी असलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हा दाखल होताच स्था.गु.शा. चे पथकाने पाठलाग करून अवघ्या एका तासाच्या आत सदर आरोपींना कार व गुन्हाकरण्यासाठी वापरलेल्या बोलेरो जीप सह ताब्यात घेतले आहे. फिर्यादी शैलेश मुरलीधर जंगाले, रा. मानवत रोड, ता. मानवत, जि. परभणी यांचे राहत्या घरासमोर ऊभी असलेली मारोती कार दिनांक 08/10/2023 रोजी 22.00 वा. सुमारास पाहिले असता कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यावरून पोलिस ठाणे मानवत येथे दिनांक 09/10/2023 रोजी गु.र.नं. 348/2023 कलम 379
भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटने वरून.पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. मॅडम यांनी तात्काळ सदर आरोपींना सापळा रचून पकडण्याबाबत आदेश व सुचना दिल्याने स्था. गु. शा. चे पथक सदर आरोपी व कार चा शोध घेणे कामी रवाना करण्यात आले. त्यादरम्यान गोपनिय व खात्रीशिर माहिती मिळाली की गुन्ह्यातील चोरी केलेली कार ही एका बोलेरो जीप ने टोचन करून पेडगांव रोडने घेवून जात आहेत त्यावरून सापळा रचून आरोपी क्र.

1) शेख इर्फान ऊर्फ शेख पप्पू शेख जलील, वय 20 वर्षे,रा. नुतन नगर, हुडको, परभणी व





2) शेख सोहेल शेख गौस, वय 23 वर्षे, रा.धार रोड परभणी



यांना सदर गुन्ह्यात चोरीस गेलेल्या कार तसेच सदर मारोती कार क्र. MH12AF3273 व चोरी करण्याकरता वापरलेली बोलेरो जीप क्र. MH30L8867 असा एकूण 2,75,000/- रुपयांच्या. मुद्देमालासह पाठलाग करून स्था.गु.शा. चे पथकाने ताब्यात घेतले आहे. इतर 2 आरोपी फरार झालेले आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. मॅडम व अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे  व पो.नि.स्था.गु.शा..वसंत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग भारती, पोउपनि . गोपीनाथ वाघमारे, . अजीत बिरादार, पोलिस अंमलदार बालासाहेब तुपसुंदरे,सचिन भदर्गे, राहूल परसोडे, विलास सातपूते, रविकुमार जाधव, रंगनाथ दुधाटे, सिध्देश्वर चाटे,दिलावर पठाण, विष्णू चव्हाण, नामदेव डुबे, परसराम गायकवाड, शेख रफीक, मधूकर ढवळे, निलेश परसोडे, हनुमान ढगे, कैलास केंद्रे सर्व नेमणुक स्था.गु.शा. व सायबर सेल चे गणेश कौटकर यांनी मिळून केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!