वझर येथील श्री भगवानगड निधी अर्बन बॅंकेच्या संचालकाला लोकांची फसवनुक केल्याप्रकरणी पुणे येथुन केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

परभणी – सवीस्तर व्रुत्त असे की  जानेवारी -1- 2022 ते मध्ये आरोपी नारायण अर्जुन नागरगोजे, देहू रोड, आळंदी, जि. पुणे याने
मौजे वझर, ता. जिंतूर येथे श्री भगवानगड निधी अर्बन लि. या बँकेची शाखा स्थापन करून स्थानिकांना ठेवीवर चांगले व्याज व कमी दरात कर्ज उपलब्ध करून देतो असे आश्वासन देवून स्थानिक
लोकांकडून बँकेमध्ये ठेवी बचत खाते स्वरूपात लाखो रुपये गुंतवणूक करून घेतले व अल्पावधीतच शाखा बंद करून निघून गेला होता. त्यास स्था.गु.शा. च्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी जयंत ग्यानोजी मते, रा. वझर ता. जिंतूर यांनी दिनांक 17/04/2023 रोजी पो.स्टे. बामणी येथे येवून आरोपी नारायण अर्जुन नागरगोजे, देहू रोड, आळंदी, जि. पुणे याचे विरूध्द तक्रार
दिली की, फिर्यादी व साक्षीदारांचे बँकेत गुंतवलेले 10,45,000/- रुपये घेवून पसार झाला आहे. त्यावरून पो.स्टे. बामणी येथे गु.र.नं. 50/2023 कलम 420, 406, 418, 34 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा
आर. मॅडम यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून सदर गुन्ह्याचा तपास आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तसेच सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेवून अटक करण्या बाबत पो.नि.स्था.गु.शा. वसंत चव्हाण व तपासी अधिकारी स.पो.नि. . एस.डी.रामोड यांना सुचना व आदेश देण्यात आले. त्यावरून स्था.गु.शा. व आर्थीक गुन्हे शाखेचे पथक नेमून आरोपीचा शोध घेत असता आरोपी आळंदी, जि.पुणे येथे असल्याची गोपनिय व खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पथक त्या दिशेने रवाना करण्यात आली. सदर ठिकाणी आरोपीस सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन
मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यालयाने आरोपीस 03 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
सदरची कारवाई . पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. मॅडम व अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे साहेब व पोलिस निरीक्षक स्था.गु. शा. . वसंत चव्हाण साहेब यांचे मार्गदर्शनाखाली
स.पो.नि. .पांडूरंग भारती, पोलिस अंमलदार परसराम गायकवाड, राहूल परसोडे, सिध्देश्वर चाटे, डुबे, दिलीप निकाळजे सर्व नेमनुक स्था.गु.शा. परभणी तसेच स.पो.नि. श्री. एस. डी. रामोड, पोलिस अंमलदार पंडीत खरडे, शेख जुबेर व सायबर सेल चे बालाजी रेड्डी व गणेश कौटकर यांनी मिळून केली आहे.
पोलिस अधीक्षक परभणी श्रीमती रागसुधा आर. मॅडम यांनी भगवानगड अर्बन निधी लि. बँक तर्फे कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थीक गुन्हे शाखा, परभणी येथे संपर्क साधावा असे आव्हान केले आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!