
फोटो व व्हिडीयो व्हायरल करण्याची धमकी देणार्या जिम ट्रेनरला खंडणी विरोधी पथकाने केली अटक…
पिंपरी-चिंचवड- ( सुनील सांबारे) – सवीस्तर व्रुत्त असे की सदर प्रकरणात जिममधे येणाऱ्या एका विद्यार्थाचा पेन ड्राईव्ह ज्यात त्याचा काहीतरी वैयक्तिक डेटा होता तो व्हायरल करायची धमकी जिम ट्रेनर देतोय अशी तक्रार प्राप्त झाली होती, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात छोटे-मोठे व्यावसायीक कंपनी तसेच जनतेकडून कोणत्याही प्रकारे जबदस्तीकरुन, त्यांचेकडून हप्ता वसुली करुन, खंडणी गोळा करणाऱ्या इसमाबाबतची माहिती निर्भिडपणे देण्याकरीता पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात पोलिस स्टेशन व खंडणी विरोधी पथकामार्फत दर्शनीय भागावर फ्लेक्स लावुन, नागरीकांना निर्भीडपणे तक्रार द्यावी याबाबत जाहीर आवाहन करण्यात आले होते म्हनुनच एका कॉलेज विद्यार्थ्याने खंडणी विरोधी पथकाकडे येवुन कळविले की, त्याचा हरविलेला
पेनड्राईव्हमधील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन, त्याचेकडे ०५ लाख रुपयांची खंडणी मागणी करुन, पैसे दिले नाहीतर मारुन टाकण्याची धमकी एका अनोळखी मोबाईल नंबरव्दारे अज्ञात इसमाने दिल्याचे सांगितले. त्यानुसार वेळोवेळी भिती घालून त्याचेकडून वेगवेगळ्या मार्गाने १४,००० /- रु घेतलेले
आहेत. व अजुनही पैशाची मागणी करत असल्याचे सांगितले. सदर तक्रारीचे गांभीर्य पाहून सदर माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी पोलिस आयुक्तांना दिली असता, त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तक्रारदार यांचा जबाब नोंद करुन, तात्काळ चाकण पोलिस ठाणे गुरनं. ८५७/२०२३ भादवि कलम ३८४,३८६,३८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीस खंडणी मांगणाऱ्या मोबाईल नंबरचे व त्याने पाठविलेल्या क्युआर कोडचे तांत्रिक विश्लेषण करुन, आरोपी
मिथुन सोपान मुंगसे वय – ३६ वर्षे रा. सध्या चक्रेश्वर मदीर रोड, चाकण, पुणे मुळगाव मुपो. रासे, ता. खेड, जि. पुणे


यास सापळा लावुन ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी करता, तो
फिर्यादी ज्या जीममध्ये व्यायामासाठी जातो. तेथे जीममध्ये ट्रेनर आहे. जीममध्ये फिर्यादी व त्याचे मित्रांमध्ये झालेल्या चर्चेतून, फिर्यादीचा पेनड्राईव्ह हरवलेला असुन, त्यात फिर्यादीचे पर्सनल फोटो व व्हिडीओ असल्याचे समजले. त्यातुनच त्याने फिर्यादीस ब्लॅकमेल करुन, पैसे उकळण्याचा प्लॅन केला असल्याचे सांगितले.
सदरचा खंडणीचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणुन, आरोपीस त्याने गुन्हयात वापरलेल्या मोबाईल फोनसह पुढील कारवाई कामी चाकण पोलिस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चाकण पोलिस स्टेशन करीत आहे.
सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांचेकडे कोणत्याही प्रकारे खंडणीची मागणी होत असल्यास, त्यांनी खंडणी विरोधी पथकास मोबाईल क्रमांक 7517751793 तसेच ईमेल आयडी
piaec.pcpc-mh@mahapolice.gov.in व indgrevcell-pcpc@mah.gov.in यावर संपर्क साधावा.
सदरची कारवाई विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ.संजय शिंदे पोलिस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलिस आयुक्त,स्वप्ना गोरे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, सतिश माने, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहा पोलिस निरीक्षक उध्दव खाडे, पोलिस अंमलदार किरण काटकर, प्रदीप गोडांबे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस व नागेश माळी (तांत्रिक विश्लेषण विभाग) यांचे पथकाने केली आहे.



