घरफोडी करुन किंमती स्क्रॅब चोरणार्यास उत्तरप्रदेशातुन केली अटक,चिखली पोलिसांची कामगिरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चिखली(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे – सवीस्तर व्रुत्त असे की
चिखली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अनेक वर्कशॉप, स्क्रॅब दुकान, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक असुन गेले काही दिवसांपासुन वर्कशॉप व स्क्रॅच दुकानांमध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रीचे वेळी पेट्रोलिंग नेमण्यात आली असुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने चिखली पोलिस स्टेशन मार्फत वेळोवेळी ट्रॅप लावण्यात येत होते त्यानुसार चिखली पोलिस स्टेशन गु.रजि. नंबर ६७६/२०२३ भादवी कलम ३९४, ४५४, ४५७, ३८०, ३२४, ३२३,
३४,५११ हा गुन्हा दिनांक १५/१०/२०२३ रोजी दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये आरोपीनी फिर्यादी

अजिझु रहिमान उबैदुल्ला खान यांचे हरगुडे वस्ती, चिखली, पुणे येथील बर्मा इंडस्ट्रीज या शॉपमध्ये घुसुन त्यांना मारहाण करुन
त्याचे शॉपमध्ये ठेवलेला १,५०,०००/- रुपये किंमतीचा, २०० किलो वजनाचा कार्बाईड इनसर्ट या नावाचा स्क्रॅब माल घरफोडी करुन चोरुन नेला होता.
यांतील फिर्यादी यांचे दुकानातून यापूर्वी देखील कार्बाईट इनसर्टचा स्क्रॅबचा ४६७ किलो वजनाचा, ३,५०,०००/- रुपये किंमतीचा माल चोरीस गेला होता त्याबाबत चिखली पोलिस स्टेशन गु.रजि. नंबर ६०४/२०२३, भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे हा गुन्हा दाखल होता. वरील दोन्ही गुन्हे हे सराईत आरोपींनीच केले असण्याची दाट शक्यता असल्याने चिखली पोलिस स्टेशनचे गुन्हे
प्रगटीकरण शाखेच्या कर्मचा-यानी परीसरातील २०-२२ ठिकाणची सिसिटिव्ही फुटेज चेक केली असता त्याना सदरच्या गुन्हयातील एक आरोपी हा





सनी विनोद गौड वय ३२ वर्षे, राह. दत्तमंदीराजवळ, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे
हा असल्याचे व त्याने त्याचे ईतर साथीदाराचे मदतीने सदरच्या घरफ़ोड्या व जबरी चो-या केल्याचे त्याचे तपासात समोर आले. त्यानुसार तपास करून पाहिजे असलेला आरोपी संजय राणावत याचे मोबाईल फोन नंबरचे सीडीआर प्राप्त करुन त्यांचे तांत्रीक विश्लेषण केले असता आरोपी संजय राणावत हा उत्तरप्रदेश याठिकाणी असल्याचे लोकेशन प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे चिखली पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर  काटकर यांनी तात्काळ सपोनि  तौफिक सय्यद व पोलिस स्टाफ असे पथक उत्तरप्रदेश येथे रवाना केले. त्याप्रमाणे आरोपी



संजय रामप्रसाद रानावत, वय-३२ वर्ष, रा. मुळगांव- माझा मानपुर, ता. हरेय्या, जि. बस्ती राज्य उत्तरप्रदेश, सध्या हरगुडेवस्ती चिखली पुणे



यास गौर पोलिस स्टेशन जि. बस्ती राज्य उत्तरप्रदेश चे हद्दीतून ताब्यात घेवून त्यास चिखली पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले. त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने कार्बाईट इनसर्टचा माल हा त्याचे मित्र सनी गौड यानी मिळुन चोरलेला असल्याचे
सांगुन सदरचा माल जमशेर इक्बाल चौधरी, याचे मार्फ़तीने औरंगाबाद या ठिकाणी विकला असल्याचे सांगितले,
त्याप्रमाणे स.पो.नि सय्यद व टिमने औरंगाबाद या ठिकाणी जावून गुन्हयातील  किमती कार्याइंड इनसर्ट या नावाचे स्क्रॅच मटेरियल एकूण वजन ३६७ किलो. असा माल हस्तगत केलेला आहे. सदरचा माल हा चिखली पोलिस स्टेशन गु.रजि. नंबर ६०४/२०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे या गुन्हयातील चोरीस गेलेला
माल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तसेच गुन्हयातील निष्पन्न आरोपी

२) सनी विनोद गौड वय २१ वर्षे, राह. दत्तमंदीराजवळ, बालाजीनगर
झोपडपट्टी, भोसरी, पुणे,

३) जमशेर इकबाल चौधरी वय ४६ वर्षे, सध्या राह. अशरफ नगर, अल्फीया टॉवरचे समोर, गल्ली नंबर ५, कोंढवा, पुणे मुळ राह. ग्राम मानवा ता.चानवापुर, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश यांना तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तपास करुन तात्काळ अटक करण्यात आली असून आरोपी सनी गौड याने सांगितल्याप्रमाणे पिंपरी पुणे या ठिकाणाहून २२,४८३/- रुपये किंमतीचे ३० किलो, कार्बाईड इनसर्ट स्क्रॅब मटेरियल जप्त करण्यात आले आहे. सदरचा माल देखील चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ६०४/२०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे या गुन्हयातील चोरीस गेलेला माल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तसेच तपासात आरोपी सनी गौड याने चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ६७६/२०२३ भादवी कलम ३९४,४५४,४५७, ३८० हाही गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्या गुन्हयातील रु.३७,५००/- रुपये किंमतीचा, ५० किलो,
कार्बाईड इनसर्ट चा माल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे वरील आरोपींना अटक करुन चिखली पोलिस स्टेशन गु.रजि. नंबर ६७६ / २०२३ भादवी कलम ३९४,४५४,४५७, ३८० वगैरे व चिखली पोलिस स्टेशन गु.रजि. नंबर ६०४/२०२३ भादवी कलम ४५४, ४५७, प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आलेले असुन दोन्ही गुन्हयातील एकुण ३,३५,०३६/- रुपये किमतीचा ४४७ किलो कार्बाईड इनसर्ट माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी विजयकुमार चौबे पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड,संजय शिंदे सह पोलिस आयुक्त,वसंत परदेशी अप्पर पोलिस आयुक्त , संदीप   डोईफोडे, पोलिस उपआयुक्त परिमंडळ-३,
पिंपरी चिंचवड, . राजेंद्र गौर, सहा. पोलिस आयुक्त, भोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली  ज्ञानेश्वर काटकर वरीष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस स्टेशन यांचे अधिपत्याखाली सपोनि  तौफिक
पोउपनिरी अमरदिप  पुजारी, पोहवा गर्जे, सावंत,  नांगरे,  तारळकर, साकोरे,नानेकर, शिंदे, मासाळ,  मोहिते, पोना  कांबळे ,राठोड, पिंजारी, पोशि/ सकपाळ, भोर,  नाईक यांनी यशस्वी रित्या पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!