घरातुन लॅपटॅाप-मोबाईल चोरणारी आंतराज्यीय टोळी वाकड पोलिसांचे ताब्यात,२३ गुन्हे केले उघड…
भरदिवसा घरात घुसुन लॅपटॅाप-मोबाईल चोरणारी टोळी वाकड पोलिसांचे ताब्यात….
पिंपरी- चिंचवड (महेश बुलाख) – गेल्या काही महिन्यांमध्ये घरातील लॅपटॉप व मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली होती. म्हणुन विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त प्रमाणात गस्त घालुन संशयीत इसमांना ताब्यात घेवुन गुन्हे उघड करणेबाबत आदेशीत केले होते. वाकड पोलिस स्टेशन हद्दीत देखील सकाळचे वेळी घरात घुसुन लॅपटॉप/मोबाईल चोरीचे घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गणेश जवादवाड, बरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे यांनी तपास पथकातील सपोनि. संतोष पाटील व पोउपनि. सचिन चव्हाण यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे जास्तीत जास्त अंमलदार हे पहाटेचे वेळी गस्तकरीता नेमुन त्यांचे नेमलेले बातमीदारांचे मार्फत माहिती काढुन सदरचे गुन्हयांना आळा घालून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले.
दाखल गुन्हयांचे तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाने सिसीटीव्हीचे आधारे शोध घेत तीन वेगवेगळ्या वर्णनाचे आरोपी हे वाकड हद्दीत चो-या करुन काळेवाडी फाटा येथुनच ते रिक्षाने पिंपरीकडे जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सपोनि. संतोष पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागातील अंमलदार यांचे वेगवेगळे ०४ पथके तयार करुन भुमकर चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी या ठिकाणी सापळा कारवाई करुन सिसीटीव्ही फुटेजमधील संशयीत इसम मिळुन आलेस त्यांना ताब्यात घेणेकरीता सांगीतले. आरोपी एक-दोन दिवस गॅप ठेवुन गुन्हा करण्यासाठी येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सापळा कारवाई मध्ये सुरवातीला दोन दिवस कोणीही संशयीत मिळुन आले नाहीत. सापळा कारवाई सुरू ठेवत संशयीत इसमांचा शोध सुरु असताना काळेवाडी फाटा येथे एक इसम संशयीतरित्या चालत जाताना दिसला. त्याचा चेहरा सिसीटीव्ही मधील संशयीत इसमांसारखे दिसल्याने त्याला लागलीच ताब्यात घेवून झडती घेतली असता त्याचेकडे ०३ मोबाईल व ०२ लॅपटॉप मिळुन आले. त्यामुळे शोध सुरु असणारे हेच आरोपी आहेत हे सिध्द झाले. आरोपीचे नाव
साँदराजन गोविंदन (वय २१ वर्षे), मुळ रा.नं.७५, उदयराज पालयम, पो.थोट्टलाम, मादनुर ता. अंबुर, जि.वेल्लोर राज्य- तामीळनाडु
अशी होती. त्यांच्याशी बोलतांना भाषेची अडचण निर्माण झाली, आरोपीला तामिळ भाषा सोडुन कोणतीही भाषा येत नव्हती. वाकड पोलिस ठाणेकडील पोशि. सतीश पिल्लामारी यांना सदर भाषा येत असल्याने त्यांना तपास टिम मध्ये घेण्यात आले. आरोपी तामिळनाडु राज्यातील ज्या भागातील आहे तेथे याच पध्दतीचे गुन्हा करणारे आरोपी राहतात, तसेच सदर आरोपी गुन्हयातील मुद्देमाल परत करत नाहीत अशी माहिती प्राप्त झाली. आरोपी ज्या ठिकाणी राहतात तेथे आरोपी ठरवलेल्या वेळेत परत आले नाहीत तर त्यांचे कुंटबातील इतर सदस्य व साथीदार रुम सोडुन मुद्देमालासह पळून जातात अशी माहिती प्राप्त झाली. ताब्यात असलेला आरोपी कोणतेही सहकार्य करत नव्हता तसेच राहण्याचा पत्ता सांगत नव्हता त्यामुळे तांत्रिक तपासाचा आधार घेत आरोपी भोसरी येथे राहण्यास असल्याचे निष्पन्न केले. परंतू तपास पथक भोसरी येथे पोहचण्यापुर्वी आरोपीचे साथीदार व कुंटबिय पळुन गेले होते. त्यांच्या मोबाईल नंबर चा तांत्रिक तपास केला असता पळुन गेलेले आरोपी हे त्यांचे मुळ गांवी तामिळनाडु येथे जाण्यासाठी बैंगलोर (कर्नाटक) येथे जाणार हे निष्पन्न केले. पंरतु त्या नंतरही पुण्यातुन बैंगलोर जाण्यासाठी अनेक बस, ट्रॅव्हल्स, ट्रेन असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. पंरतु तपास पथकाने आरापींचा कौशल्यपुर्ण तपास करित पळुन जात असलेले आरोपी हे एम.आर. टूव्हल्स ने जात असल्याचे निष्पन्न करित सदर ट्रॅव्हल्सचा पाठलाग करित खंबाटकी घाट सातारा येथे जावुन गाडी थांबवुन आरोपी नामे १) गुनासेकर संकर (वय २१ वर्षे)
२) तामीलारसन मादेश (वय २१ वर्षे) सर्व सध्या रा.चंद्रशेखर माणिकचंद जैन यांचे खोलीत, जैनशांती अदिनाथनगर, सुखवानीबाग, भोसरी पुणे मुळ रा.नं.७५, उदयराज पालयम, पो. थोट्टलाम, मादनुर ता.अंबुर, जि.वेल्लोर राज्य- तामीळनाडु
यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे अनेक लॅपटॉप व मोबाईल मिळुन आले. तिन्ही आरोपींना गुन्हयात अटक करून त्यांचेकडे तपास केला असता सदरचे आरोपी हे तामीळनाडु राज्यातून चोरी करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड परीसरात येवून वेगवेगळ्या भागांमध्ये सकाळचे वेळी फिरुन उघडे असलेल्या घरात प्रवेश करुन घरातील मोबाईल लॅपटॉपची चोरी करुन, त्याची तामीळनाडु राज्यात जावुन विक्री करीत असलेबाबत समजले. आरोपींनी वाकड हद्दीत तसेच पिंपरी चिंचवड मधील वेगवेगळया ठिकाणी घरांमध्ये चोऱ्या केलेचे कबुली दिली.
घरांची झडती घेतली असता त्यांचे घरामधून मोठया प्रमाणावर मोबाईल व लॅपटॉप मिळून आले. आरोपींनी चोरलेले काही लॅपटॉप व मोबाईल फोन त्यांचे मुळ गांवी तामिळनाडु येथे पाठवल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठांचे परवानगीने पोउपनि सचिन चव्हाण व अंमलदार असे तामिळनाडु येथे जावुन कौशल्यपुर्ण तपास करित अनेक लॅपटॉप व मोबाईल फोन जप्त केले. आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले मोबाईल व लॅपटॉप बाबत पिंपरी चिंचवड मधील विविध पोलिस स्टेशनला एकुण २३ गुन्हे दाखल असुन आरोपींकडुन एकुण ६० मोबाईल फोन व १४ लॅपटॉप सह रोख रक्कम असा एकुण १४,३०,०००/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे सह पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त, डॉ.काकासाहेब डोळे पोलिस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विठ्ठल साळुंखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि. सचिन चव्हाण, सपोफो. विभीषण कन्हेरकर, सपोफो. बाबाजान इनामदार, सपोफो. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा, बंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि, अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. कॉतेय खराडे, पोशि रमेश खेडकर यांनी मिळुन केली आहे.