पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ उघड केले ५ घरफोडीचे गुन्हे अट्टल घरफोड्या अटकेत…
पिंपरी-चिंचवड: (सुनील सांबारे) – सवीस्तर व्रुत्त असे की
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घरफोडी चोरी करणा-या गुन्हेगारांचा छडा लावणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले आहे.
गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार घरफोडी चोरी करणा-या गुन्हेगाराचा शोध घेत होते.त्यानुसार दिनांक २६/०८/२०२३ रोजी काटे इस्टेट, चोविसावाडी च-होली दीघी परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी दिवसा एकाचवेळी ६ ठिकाणी घरफोडून चोरी केल्याची घटना घडली. गुन्हे शाखेच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. गुन्हयाचा सखोल तांत्रीक तपास करून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली असता त्यामध्ये दिसत असलेले आरोपी हे घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार
१) राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर रा. बाघोली (गौर) ता. कळंब जि. धाराशिव
२) राहूल उर्फ लल्या हिरामण लष्करे रा. गौसिया मस्जिदजवळ,
काळाखडक झोपडपटी, वाकड पुणे हे असल्याचे स्पष्ट झाले. सदर गुन्हेगारांचा गुन्हे शाखा युनिट २ कडून लातुर, उस्मानाबाद, वाघोली, मुंबई, पुणे अशा ठिकाणी पथक पाठवुन कसोशिने शोध घेतला.
सराईत गुन्हेगार राहुल उर्फ लल्या हिरामण लष्करे यास यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. दोन्ही आरोपी सराईत घरफोडी चोरी करणारे असल्याने ते गुन्हा करुन पळुन जावुन त्यांचे अस्तित्व लपवुन फिरत होते. गुन्हे शाखा युनिट २ चे सफौ शिवानंद स्वामी यांना त्यांचे गोपनिय बातमीदारांकरवी मिळाले बातमीवरुन दिनांक २२/९/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने आरोपी
१) राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर रा. वाघोली (गौर) ता. कळंब जि. धाराशिव
२) राहूल उर्फ लल्या हिरामण लष्करे रा.गौसिया मस्जिदजवळ, काळाखडक झोपडपटी, वाकड पुणे यांना निगडी परिसरात आले असतांना पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना गुन्हे शाखा कार्यालयात घेवून येवून त्यांचेकडे सखोल तपास केला
असता त्यांनी दिघी पोलिस स्टेशन येथे दाखल असलेले २ घरफोडी चोरीचे गुन्हे तसेच चिंचवड, लोणीकंद, शिरवळ पोलिस स्टेशन येथे दाखल असलेले असे एकूण ५ घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीत यांचेकडे अत्यंत कौशल्याने तपास करुन सुमारे ७ लाख रुपये किंमतीचा ऐवज त्यामध्ये ९ तोळे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ४५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने, दुचाकी वाहन असा चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट २ कडून सुरु आहे.
आरोपीकडून उघडकीस आणलेले गुन्हे-
१) दिघी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४०२/२०२३ भादवि कलम ४५४ ३८०
(२) दिघी पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४०४/२०२३ भादवि कलम ४५४, ३८०
३) चिंचवड पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३७२/२०२३ भादवि कलम ४५४,४५७,३८०,
४) लोणीकंद पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५६१/२०२३ भादवि कलम ४५४, ३८०
५) शिरवळ पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १४५/२०२२ भादवि कलम ४५४, ४५७, ३४
आरोपींवर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्हयांचा पुर्व इतिहास-
राहूल उर्फ लल्या हिरामण लष्करे
१) देहूरोड पोस्टे ७१७/२०२० भादवि कलम ३९२, ३२३, ३४
२) देहूरोड पोस्टे ५२१/२०२१ भादवि कलम ३९२, ३४
३) गोरेगाव (रायगड) पोस्टे ०९/२०२३ भादवि कलम ४५७, ३८०
४) महाड टाऊन पोस्टे (रायगड) १२६/२०२३ भादवि कलम ४५४, ४५७
५) रत्नागिरी पोस्टे ४५४, ४५७, ३८०, ३४
६) चतुःश्रृंगी पोस्टे १२८५/२०२० भादवि कलम ३७९, ३४
७) वाकड पोस्टे ३४७/२०१७ भादवि कलम ३२६, ३२५, ३२४
चाकड पोस्टे १००४/२०१९ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४
९) वाकड पोस्टे १२१२/२०१९ भादवि कलम ३२६, ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६
(१०) वाकड पोस्टे ६०१/२०२२ आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मपोका कलम १४२
११) बाकड पोस्टे ७६४/२०२२ आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मयोका कलम १४२
राम उर्फ रामजाने लक्षण क्षिरसागर
१) चिंचवड पोस्टे १३८/२००८ भादवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४
(२) हिंजवडी पोस्टे २०७/२०१५ भादवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४
३) मुंढवा पोस्ट १००/२०१५ भादवि कलम ४५४, ३८०, ३४
४) चिंचवड पोस्टे २९६/२०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८०
५) रत्नागिरी शहर पोस्टे ८३/२०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४
६) गोरेगाव (रायगड) पोस्टे ०९/२०२३ भादवि कलम ४५७, ३८०
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अंमलदार शिवानंद स्वामी, जमीर तांबोळी,प्रमोद वेताळ, उषा दळे, जयवंत राऊत,देवा राऊत, शिवाजी मुंढे यांनी केली आहे. आतिष कुडके, अजित सानप, यांनी केली