पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ ने आवळल्या दोन सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या,अंगझडती २ गावठी पिस्टल व काडतुस जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पिंपरी चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०९/११/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम त्यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी व अंमलदारांसह पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांची माहीती घेत असतांना पोलिस निरीक्षक जितेंद्र  कदम यांना बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि,दोन सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार कमरेला पिस्टल लावुन दापोडी परिसरात फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस उपायुक्त सतिश माने यांना याबाबतची माहीती कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करुन सदर पथकाला सुचना व मार्गदर्शन करुन तात्काळ दापोडी भागात रवाना केले व संशयितांचा शोध घेतला असता सदर गुन्हेगार हे
फुगेवाडी अल्फा लावल कंपनीजवळ थांबले असल्याची माहीती काढुन त्या परिसरात सापळा लावला. बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचे इसम कंपनीच्या भिंतीलगत बोलत थांबले असल्याचे पोलिस पथकाचे निदर्शनास आले त्याचवेळी सदर संशयित इसम हे पळुन जाण्याची तयारी करीत असतांना पोलिस पथकाने अत्यंत शिताफीने त्यांना पकडले. त्यांची नावे

१) मुनाफ रियाज पठाण वय २७ वर्षे, रा. नानापेठ पुणे 





२)देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफाडे वय २७ वर्षे रा. कळसमाळवाडी रामगडवस्ती विश्रांतवाडी पुणे



अशी असल्याची सांगितली. दोन्ही इसमांचे अंगझडतीमध्ये कमरेला लावलेली दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आली. यातील इसम नामे मुनाफ रियाज पठाण वय २७ वर्षे, रा. नानापेठ पुणे व २) देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफाडे हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचा पिस्टल जवळ बाळगण्याचा नक्की काय उदेश होता, पिस्टल हत्यार नक्की कोठून व कोणत्या कारणासाठी आणले, पिस्टल हत्यार कोणाला विक्री करण्यासाठी  आणले होते का याबाबत सखोल तपास गुन्हे शाखेकडून करुन आरोपींचे विरुध्द गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस शिपाई अजित आण्णा सानप यांची सरकार तर्फे
भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे फिर्याद घेवून भोसरी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त  विनय कुमार चौबे, सह पोलिस संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त  वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस उपायुक्त गुन्हे  सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक  जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गणेश माने, पोलिस अंमलदार दिलीप चौधरी, शिवानंद स्वामी,
उषा दळे, देवा राऊत, नामदेव कापसे, आतिष कुडके, विपुल जाधव, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर, यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!