खुनाच्या आरोपातील पाहिजे असलेला आरोपी दिघी पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दिघी(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे
सविस्आतर वृत्त असे की,  आझादनगर पोलिस स्टेशन जिल्हा धुळे येथिल दिनांक ०८/१०/२०२३ रोजी दाखल गुन्हा रजि नं २७५ / २०२३ भादवि कलम ३०२, ३६४, १४३, १४७, १४८, १४९,३२३,५०४,५०६ आर्म अॅक्ट १२०ब (४) २५ ,महाराष्ट्र अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) मधील फरार व रेकॉर्डवरिल गुन्हेगार

१)महेश ऊर्फ घनश्याम पवार व त्याचे साथीदार





२) गणेश माळी



३) जगदीश चौधरी



 असे मयत  शुभम साळुंखे यांचा व्यवसायामधील बाचाबाचीवरुन कोयता, फायटर व धारदार शस्त्रांनी दिनांक ८/१०/२०२३ रोजी खुन करुन पळुन गेलेले होते, त्याबाबत आज रोजी दिघी पोलिस स्टेशन कडील पोलिस अंमलदार  सोमनाथ खळसोडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत सदर आरोपी हे मॅग्झीन चौक, दिघी येथे उभे असल्याबाबत गुप्त बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक  मच्छिंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शन व आदेशान्वये पोउपनि ए. एन. कटपाळे, पोलिस हवालदार  मुकुंद कोकणे, महिला पोलिस नाईक कांचन पंडीत,  मपोअंमलदार  प्रतिक्षा बच्छाव,  प्रियांका लाकुडझाडे व पोलिस मिञ प्रविण डोसे असे रवाना होवुन मॅग्झीन चौक, दिघी येथे तिघे जण उभे असल्याचे दिसल्याने त्यांची छायाचित्रांवरुन खात्री करून त्याच्या दिशेने जात असताना पोलिसांना बघुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना आरोपीना शिताफीने ताब्यात घेतले. सदरवेळी क्राईम युनिट धुळे कडील स्टाफ देखिल पोहोचले त्यांचे मार्फत
आरोपीबाबत खात्री करुन संयुक्तरित्या आरोपीना दिघी पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले सदर
आरोपींकडुन एक ग्लॅमर मोटार सायकल क्रमांक एम एच १८ बी डब्लु ७४८३ जप्त करुन ताब्यात घेण्यात आली.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी,  पोलीस उपायुक्त, परीमंडळ ०३, संदिप डोईफोडे, यांचे आदेशान्वये, सहा. पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर  भोसरी एमआयडीसी विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत दिघी पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच  दशरथ वाघमोडे पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिघी पोलिस स्टेशन यांचे सूचनेनुसार पो उप नि ए. एन. कटपाळे, पोलिस हवालदार  मुकुंद कोकणे, महिला पोलीस नाईक,  कांचन पंडीत पोलिस अंमलदार  सोमनाथ खळसोडे, मपो अंमलदार  प्रतिक्षा बच्छाव,  प्रियांका लाकुडझाडे व पोलीस मित्र प्रविण डोसे यांनी आरोपी यांचे छायाचित्रातील वर्णनावरुन फरार रेकॉर्डवरील आरोपीची माहिती प्राप्त होताच मॅग्झीन चौक दिघी येथुन ताब्यात घेतले. सदरच्या कारवाईत आरोपींकडुन एक ग्लॅमर मोटार यायकल क्रमांक एम एच १८ बी डब्लु ७४८३ जप्त करण्यात आली असुन एकुण ३ आरोपींना धुळे एलसीबी चे पोउपनि  अमरजीत मोरे व पथकाच्या ताब्यात देण्यात आले .सदर गुन्हयाचा तपास आझादनगर पोलिस स्टेशन जिल्हा – धुळे यांचेकडे चालु आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!