बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणार्या एका महीलेस व एका पुरुषास खंडणी विरोधी पथकाने केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पिंपरी-चिंचवड(सुनील सांबारे) – सवीस्तर वुत्त असे की मिळालेल्या माहीतीनुसार एका प्रतिष्ठित राष्ट्रीय बॅंकेच्या सिनीअर बँक मॅनेजरला खंडणी मागणा-या महिलेसह एकास रंगेहाथ पकडून, तात्काळ अटक करण्यात आली असुन
“तुझे रेकॉर्डींग व व्हॉट्सअॅप चॅट आहे असे सांगून, अडीच लाख रुपये पाहीजेत नाहीतर तुला खोट्या गुन्हयात अडकवु, तुझी नोकरी घालवू व संपवुन टाकू अशी धमकी देवुन, २५ हजार रुपये खंडणी घेवुन, आणखीन ०२ लाख रुपये खंडणी मागितली.” या मजकुराचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी.पोलिस आयुक्त यांना दिला होता. अर्जातील गांभीर्य ओळखुन, पोलिस आयुक्तांनी खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद  पवार यांना खात्री करुन, तात्काळ कारवाई करण्याचे सुचना दिल्या. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी अर्जदार बँक मॅनेजर यांचेकडे चौकशी करुन, नियोजीत सापळा
लावुन, दिड लाख रुपयांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या एका महिलेसह इसम

गणेश लक्ष्मण कोळी वय – २७ वर्षे, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, प्लॉट नं. ११, हनुमान मंदीराचे बाजूस, शिवाजीनगर, पुणे यांना रंगेहाथ पकडुन, त्यांचे विरुध्द भोसरी पोलीस ठाणे
गुन्हा रजि. नंबर ८२४ / २०२३ भादवि कलम ३८४,३८६,३८७,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करुन, आरोपी गणेश लक्ष्मण कोळी व महिला आरोपीस पुढील कारवाई कामी भोसरी पोलिस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास भोसरी पोलिस स्टेशन करीत आहेत.
सदरची कारवाई  विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ.संजय शिंदे पोलिस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलिस आयुक्त,  स्वप्ना गोरे, पोलिस उप-आयुक्त,गुन्हे, . सतिश माने, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक उध्दव खाडे, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार किरण काटकर, विजय नलगे, आशिष बोटके, प्रदीप गुट्टे व मपोना संगिता जाधव (एएचटीयु) यांचे पथकाने केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!