सराईत तडीपार आरोपी करण भोसरी MIDC पोलिसांच्या तावडीत सापडला…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सराईत तडीपार आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली अटक…

पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत तडीपार आरोपीला मिळालेल्या माहितीवरून त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. तडीपार आरोपी करण कुमार जाधव (वय २६ वर्षे) रा.लक्ष्मीनगर मोशी आणि त्याचा मित्र स्वप्निल पोपट घुले (वय ३० वर्षे),रा.घुलेवस्ती, मांजरी पुणे याला सुध्दा अटक केली आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, दि.१४जानेवारी रोजी ००:३५ वा.सु. पोलिस उपनिरीक्षक अशोक तरंगे, पोहवा दातार व पोशि खांबट असे वन मोबाईलवरुन हवालदारवस्ती मोशी पुणे भागात रात्रगस्त पेट्रोलिंग करत असताना बातमीदारां मार्फत बातमी मिळाली की, तडीपार इसम नामे करण कुमार जाधव (वय २६ वर्षे) रा.लक्ष्मीनगर मोशी पुणे हा एका रिक्षा क्रमांक एमएच १४ / एचएम/६४४९ मधुन पिस्टल घेवुन सिल्व्हर लक्ष सोसायटी मोशी परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही मोशी मार्शलवरील पोशि. हंबर्डीकर यांना फोन करुन बोलावुन घेऊन आम्ही पंच व मार्शलसह पेट्रोलिंग करुन रिक्षाचा शोध घेत असताना सदरची रिक्षा सिल्व्हर लक्ष सोसायटी मोशी पुणे समोरील खदानचे कच्च्या रस्त्यावरुन जात असताना दिसल्याने सदरची रिक्षा पाठलाग करुन थांबवुन त्यातील दोन्ही इसम खदानचे दिशेने अंधाराचा फायदा घेवुन अंधारात पळुन जाऊ लागले असता पळुन जाणा-या इसमांपैकी एकास पाठलाग करुन स्टाफच्या मदतीने शिताफीने ०१:१५ वा.सू. पकडुन ताब्यात घेतले. सदर इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला एक पिस्टल व एक जिवंत राउंड मिळुन आल्याने पोहवा ए.एस. दातार यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने एमआयडीसी भोसरी पो स्टे गु.रजि नंबर २७/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२७) म.पो. अधि १४२, ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस गुन्हयात अटक करुन त्याची पोलिस कस्टडी घेतली असता त्याचेकडे पोलिस कस्टडीमध्ये अधिक तपास करता त्याने त्याचा मित्र स्वप्निल पोपट घुले (वय ३० वर्षे),रा.घुलेवस्ती, मांजरी पुणे यास एक गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड दिला असल्याचे सांगितल्याने सदर इसमाचा मांजरी येथे जाऊन शोध घेतला असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळुन आला असुन, त्यास सदरच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच पळुन गेलेल्या इसमाचा शोध सुरु असुन, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे करत आहेत.



अशा प्रकारे सदरची कारवाई ही विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड डॉ. संजय शिंदे पोलिस सहआयुक्त, पिंपरी चिंचवड वसंत परदेशी, अप्पर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संदीप डोईफोड, पोलिस उपआयुक्त गुन्हे शाखा,, डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड,डॉ. विवेक मुगळीकर, सहा.पोलिस आयुक्त, एमआयडीसी भोसरी विभाग, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र निकाळजे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशन, अशोक तरंगे, पोलिस उपनिरीक्षक, राजेंद्र पानसरे, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस अंमलदार अमोल दातार, पोहवा चंद्रकांत गवारी, पोहवा शरद गांधीले, पोहवा गणेश बोराटे, पोहवा राहुल लोखंडे, पोशि भागवत शेप, पोशि नितीन खेसे, पोशि विशाल काळे, पोशि जयदीप खांबट, पोशि हंबर्डीकर, पोशि देवकर व पोहवा राजु जाधव, पोउपआ कार्यालय परि ३ पिंचिं यांनी मिळून केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!