
पिंपरी-चिॅचवड पोलिस आयुक्तांची जगताप टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही….
पिंपरी चिंचवड पोलिसांची संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जगताप टोळीवर “मोका अंतर्गत कारवाई……
पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी लोकसभा निवडणुकांचे पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त, विनय कुमार चौबे यांनी आगामी लोकसभा निवडणुक ही भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता याव्यात यासाठी व्यापक प्रतिबंध
कारवाईचा आराखडा तयार केला असुन त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर
देण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ०८ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण ३९ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.


त्यामधे भोसरी पोलिस स्टेशन गु. रजि. नं ६८ / २०२४, भादंवि ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट ४(२५), महा.पो. कायदा कलम ३७ (१) १३५ सह, क्रि. लॉ. ॲमे. अॅक्ट कलम ३ व ७, या गुन्हयांचे
तपासामध्ये आरोपी नामे १) आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप (टोळी प्रमुख) वय २२ वर्षे रा. युवराज हॉटेलचे मागे, आदर्श नगर, मोशी पुणे २) सुनिल राणोजी जावळे वय २६ वर्षे रा रा. युवराज हॉटेलचे मागे,आदर्श नगर, मोशी पुणे ३) रोहित ऊर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे वय १९ वर्षे रा. आळंदी रोड, माई वडेवाले हॉटेलचे मागे, सागर कॅफे दुकानाचे जवळ, भोसरी, पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १३ गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
वरील टोळी प्रमुख याने त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी
संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी भोसरी, दिघी, वाकड,फरासखाना पोलिस स्टेशन हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकायदेशीररित्या
जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्याने वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमाणसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलिस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी,.पोलिस उपायुक्त (गुन्हे),संदीप डोईफोडे ,पोलिस उपायुक्त (परि-०१) स्वप्ना गोरे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे – १) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली
वपोनि नितीन फटांगरे, (भोसरी पो.स्टे) पोलीस निरीक्षक अनिल देवडे (पी. सी. बी गुन्हे शाखा), पोउपनि.शेख (भोसरी पो.स्टे) तसेच पो.हवा. सचिन चव्हाण,व्यंकप्पा कारभारी, पी.सी. बी. गुन्हे
शाखा, यांच्या पथकाने केली आहे.



