नागरिकांच्या सुरक्षेच्या द्रुष्टीकोनातुन पिंपरी-चिंचवड शहरात लावण्यात आलेले उच्च प्रतीच्या कॅमेराच्या बॅटरी चोरणार्या टोळीस गुन्हे शाखा युनिट २ ने केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पिंपरी-चिंचवड – (सुनील सांबारे)
सवीस्तर व्रुत्त असे की  पिंपरी चिंचवड शहरात स्मार्टसिटी योजनेतुन नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही
कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमे-यांसाठी लावण्यात आलेल्या जंक्शन बॉक्समधील एच बी एल कंपनीच्या १०० एच ए पॉवरच्या बॅट-या मागील काही महीन्यापासुन चोरीस जात असल्याने महत्वाच्या वर्दळीच्या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्याअनुषंगाने  पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे साहेब यांनी सदर चोरीचे गुन्हयांचा छडा लावणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते. गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांचे
मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार सातत्याने चोरटयांचा शोध घेत होते.
दिनांक १८/१०/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पथक प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींग करीत पिंपरी पोलिस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग चालू असताना युनिट २ चे सहा. फौजदार शिवानंद स्वामी व केराण्या माने यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, निराधारनगर झोपडपटी पिंपरी येथील विजय कुंदवाणी यांच्या बिल्डींगच्या मोकळया पडीक जागेमध्ये काही इसम मोटर सायकलीवरुन
बॅट-या घेवून येवून कोळशांचे पोत्यांखाली बॅट-या लपवुन ठेवत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली
सदर ठिकाणी युनिट २ च्या पथकाने लागलीच सापळा लावुन इसम  १) ओकांर सुरेश पवार वय १८ वर्षे रा. साई संतोष हौसिंग सोसायटी ए-१० पाचवा मजला रुम नंबर ५०२, मिलींदनगर पिंपरी पुणे

२)जफर जैद सिध्दीकी वय २० वर्षे रा. संजय गांधीनगर साईबाबा मंदीराच्या समोर पिंपरी पुणे





३) गणेश भुंगा कांबळे रा. निराधारनगर झोपडपटी पिंपरी पुणे



व त्यांचे इतर ३ अल्पवयीन साथीदार यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी सांगवी व निगडी परिसरातून सीसीटीव्ही जंक्शन मधील बॅट-या चोरल्याची तसेच चो-या करण्यासाठी निगडी व सांगवी भागातुन मोटर सायकली चोरल्याची कबुली दिली. आरोपी व विधीसंघर्षीत यांचेकडून बॅटरी चोरीचे व दुचाकी चोरीचे एकूण ०४ गुन्हे उघडकीस आले असुन सुमारे ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
खालील गुन्हे उघडकीस आले आहेत-
निगडी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५९७/२०२३ भादवि कलम ३७९ मधील-
निगडी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३५०/२०२२ भादवि कलम ३७९ मधील
सांगवी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५३७/२०२३ भादवि कलम ३७९ मधील
सांगवी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५०२/२०२३ भादवि कलम ३७९ मधील
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त  विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त  वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे  सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक  गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, उषा दळे, देवा राऊत, आतिष कुडके, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!