
चिखली भागात कमरेला देशी कट्टा लावुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या गुन्हे शाखा युनिट २ ने आवळल्या मुसक्या…..
पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०३/११/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील पोलिस अंमलदार पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असतांना पोलिस हवा जमीर तांबोळी व संतोष इंगळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी खात्रीशीर बातमी मिळाली कि, महादेवनगर चिखली येथे मुळचा उत्तरप्रदेशचा असलेला एक इसम गावठी कट्टा कमरेला लावुन फिरत आहे अशी बातमी मिळाली.
गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांना माहीती कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अंमलदार संतोष इंगळे, जमीर तांबोळी, सागर अवसरे, नामदेव कापसे यांचे पथकाला सुचना व मार्गदर्शन करुन महादेवनगर चिखली परिसरात सापळा लावला. बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचा इसम संशयितरित्या फिरत असल्याचे पोलीस पथकाला दिसुन आले. त्याचवेळी संशयित इसमाला पोलिस आल्याची चाहूल लागल्याने तो पळुन जावु लागला. पोलिस पथकाने त्याचा पाठलाग करुन शिताफीने
ताब्यात घेतले. त्याचे नाव
जिशान शब्बीर खान वय १९ वर्षे रा. रुम नंबर ३, भवानी स्टिल बिल्डींग, चिखली बसस्टॉप चिखली


असे असुन जिशान शब्बीर खान याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी कट्टा तसेच दोन जिवंत काडतुस त्याचेकडे मिळुन आली. इसम जिशान शेख हा टेम्पो चालविण्याचे काम करीत असुन त्याचा गावठी कट्टा बाळगण्याचा नक्की काय उदेश आहे याबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व गावठी कट्टा उत्तरप्रदेश येथुन आणल्याची माहीती सांगितली. जिशान शेख याने गावठी कट्टा नक्की कोणत्या कारणासाठी व कोणाला देण्यासाठी आणला, आतापर्यंत नक्की किती अग्निशस्त्रे उत्तरप्रदेश येथुन आणली व कोणाला दिली
आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरु आहे. इसम जिशान शब्बीर खान वय १९ वर्षे रा. रुम नंबर ३, भवानी स्टिल बिल्डींग, चिखली बसस्टॉप चिखली याचे विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे चिखली पोलिस ठाणे येथे गुन्हा
नोंद करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक
पोलिस आयुक्त गुन्हे सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस अंमलदार दिलीप चौधरी, जमीर तांबोळी, संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, उषा दळे, देवा राऊत, सागर अवसरे, नामदेव कापसे यांनी केली आहे.



