
देहु रोड हद्दीतील सराईत गुंड आकाश पिल्ले याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…
देहुरोड येथील सराईत गुंड एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत १ वर्षासाठी स्थानबद्ध…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – देहुरोड मधील सराईत अट्टल गुन्हेगारास देहूरोड पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत स्थानबद्ध केले आहे. या गुन्हेगाराने स्वतःची टोळी बनवुन त्या माध्यमातुन देहूरोड, किवळे परिसरात जबरी चोरी, दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदेशिर जमाव जमविणे, गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे एकुण १५ गंभीर गुन्हे दाखल असुन यापुर्वी त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता त्यास पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतुन ०१ वर्षाकरीता तडीपार केले होते. तरीही सदर तडीपार कालावधी दरम्यान आकाश पिल्ले याने देहूरोड परिसरामध्ये बेकायदेशिररित्या प्रवेश करून गंभीर शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे केल्याने देहूरोड परिसरामध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती.


या बाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे करणारा सराईत गुंड आकाश अरमुगम पिल्ले (वय २४ वर्षे), रा.देहूरोड पुणे याने स्वतःची टोळी बनवुन त्या माध्यमातुन देहूरोड, किवळे परिसरात जबरी चोरी, दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदेशिर जमाव जमविणे, गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे एकुण १५ गंभीर गुन्हे दाखल असुन यापुर्वी त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता त्यास पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतुन ०१ वर्षाकरीता तडीपार केले होते. तरीही सदर तडीपार कालावधी दरम्यान आकाश पिल्ले याने देहूरोड परिसरामध्ये बेकायदेशिररित्या प्रवेश करून गंभीर शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे केल्याने देहूरोड परिसरामध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती. त्याच्या कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे ते उघडपणे सदर सराईत गुंडाचे विरुध्द तक्रार देण्यास धजावत नव्हते.

सदर गुंडाची दहशत मोडून काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक देहूरोड पोलिस स्टेशन विजय वाघमारे यांनी आकाश पिल्ले याचे विरोधात नियोजित स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या कार्यालयात सादर केला. सदर प्रस्तावाची गांभिर्याने दखल घेऊन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सराईत गुंड आकाश पिल्ले यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये येरवडा कारागृह, पुणे येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश (दि.०२मे) रोजी पारित केले होते. सदर आदेशानुसार सराईत गुंड आकाश अरमुगम पिल्ले (वय २४ वर्षे) यास ३मे रोजी ताब्यात घेवुन येरवाडा कारागृह येथे स्थानबध्द केले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त, विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त, देहुरोड विभाग घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलिस अंमलदार अनिल जगताप, धिरज अंभोरे, शुभम बावनगर, स्वप्नील साबळे व इतर यांनी मिळून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


