फ्लिपकार्ट च्या हब मधुन मोबाईल चोरी करणारा वाकड पोलिसांच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वाकड(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख –  सवीस्तर व्रुत्त असे की
वाकड पोलीस ठाणे येथे दिनांक १८/११/२०२३ रोजी इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. लि., काळेवाडी, पुणे या फ्लिपकार्ट च्या हबमधील मॅनेजर यांचे तक्रारीवरुन त्यांचे हबमधील कामगार यांनी एकुण ९,४७,१६० /- रुपये किं. चे विविध कंपनीचे एकुण ३८ मोबाईल चोरीस गेलेबाबत वाकड पोलिस ठाणे गु.र.नं. १९९३ / २०२३
भा.द.वि. कलम ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपी व त्याचे इतर साथिदार यांचा शोध घेऊन गुन्हयातील चोरीस गेलेले मोबाईल फोन जप्त करणेबाबत  विनयकुमार चौबे पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी वाकड पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे यांनी दाखल गुन्ह्याचे तपासाचे आदेश वाकड पोलिस ठाणे तपास पथकाचे अधिकारी यांना दिले. त्याप्रमाणे तपास पथकातील
अधिकारी व अंमलदार तांत्रीक व पांरपारीक पध्द्तीने तपास सुरु केला. दसरा व दिवाळी चे पुर्वी फ्लिपकार्ट मध्ये ‘बिग बिलीयन डे’ हा सेल असतो. त्या काळात ग्राहकांची खरेदी प्रमाणे वाढलेले असते, त्यामुळे फ्लिपकार्ट च्या हबमध्ये मोठया प्रमाणात वस्तुंची आवक-जावक असते. त्याच काळात हबमध्ये काम करणा-या
कामगांरा पैकी काही कामगांरानी वाढलेल्या कामाचा लोढचा फायदा घेत गुन्हा केला असण्याचे निष्पन्न झाले. तपासात सुरवातीला डिलीव्हरी बॉय म्हणुन काम करणारा

आशिष भाऊसाहेब भोसले, वय २२ वर्षे, रा. रमाबाई नगर, पिंपरी लिंकरोड, दावत राईस शेजारी, सिमला हॉटेलजवळ, पिंपरी, पुणे





यास व एकविधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले असता. एकुण ०८ मोबाईल फोन मिळाले. सदर आरोपीची पोलिस
कस्टडी प्राप्त करून तपास केला असता, आरोपी



 पियुष गोविंद मोहिते, वय २३ वर्षे, रा. नमो सृष्टी अपार्टमेंट रुम नं. बी/३०१, गणेश इंटरनॅशनल स्कुल शेजारी, नेवाळे वस्ती, चिखली, पुणे



याचे नाव निष्पन्न झाल्याने त्यास अटक करुन एकत्रित कौशल्यपुर्ण तपास केला. तपासात सर्व आरोपींकडून एकुण ५,९१,२४४/- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्याचा उर्वरित मोबाईल बाबत तपास सुरु आहे.
सदरची कारवाई  विनयकुमार चौबे पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड,  डॉ. संजय शिंदे सो, सह पोलिस आयुक्त,  परदेशी, अपर पोलिस आयुक्त,  डॉ. काकासाहेब डोळे पोलिस उपायुक्त, परि २ पिंपरी चिंचवड,  डॉ. विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त ,वाकड
विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली  गणेश जवादवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विठ्ठल साळुंखे पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सफौ बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार,  राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव,  प्रमोद कदम,वंदु गिरे, पोना. प्रशांत गिलबीले, अतिक शेख,विक्रांत चव्हाण, राम तळपे, पोशि. अजय फल्ले,भास्कर भारती,  स्वप्निल लोखंडे,सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे,विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडीत
( परि ०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!