व्यापाऱ्याला रस्त्यात अडवुन रोकड लुटणार्या सराईत टोळीस वाकड पोलिसांनी केले जेरबंद,४ गुन्हे केले उघड..
वाकड(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की
पिंपरीतील होलसेल कापड दुकानदार मोहनदास सिरुमल तेजवाणी वय ६२ वर्षे रा. विजयनगर काळेवाडी पुणे यांनी दिनांक १८ रोजी वाकड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली की, ते सायं. ०६..३० वा सुमारास ते दुकानातील रोख रक्कम १४ लाख रुपये घेवून त्यांचेकडील अॅक्टीव्हा मोपेड वरुन घरी जात असताना बालाजी लॉन्स समोर काळेवाडी येथे दोन अनोळखी चोरटयांनी मोटार सायकलवरुन येवून त्यांना धक्का देवुन गाडी वरुन खाली पाडुन त्यांचेकडील १४ लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग जबरीने चोरुन नेली आहे. यावरुन वाकड पोलिस स्टेशन गु.रजि. नं. १०२८ / २०२३ भादंवि कलम ३९४,३४ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाकड पोलिस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलिस अंमलदारांसोबत गुन्हयाचा तपास करुन तात्काळ आरोपी अटक करुन रक्कम हस्तगत करणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार यांनी सिसीटीव्ही फुटेजचे आधारे तसेच बातमीदारांचे मार्फत चोरटयांचा शोध सुरु केला. गुन्हा करण्सायाठी आरोपींनी एक शाईन मोटार सायकल वापरलेचे निष्पन्न झाले. सिसीटीव्ही फुटेज मधील संशयीतांबाबत बातमीदारांकडुन माहीती घेतली असता त्यांची सुहास जोगदंड, आदित्य घायतडक अशी आहेत असे समजले. माहीती प्राप्त आरोपींचा माघ घेत त्यांना गुन्हा करणेसाठी वापरलेल्या मोटार सायकलसह काळेवाडी परीसरातुन ताब्यात घेतले असता त्यांची नावे
१) सुहास नवनाथ जोगदंड वय २२ वर्षे रा. गिरजुबाबा मंदीरामागे ११ नंबर बिल्डींग शेजारी, बौध्दनगर, पिंपरी पुणे
२) आदित्य संतोष घायतडक वय २१ वर्ष रा.१५ नंबर बिल्डींग शेजारी बौध्दनगर पिंपरी पुणे
अशी असल्याचे समजले. आरोपींचे ताब्यात गुन्हयात जबरी चोरी केलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम मिळाली. त्यामुळे आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपींचेकडे केले तपासात त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे अजुन दोन साथीदार सह मिळुन कट कारस्थान रचुन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर गुन्हयात भादवि कलम १२० (ब) अशी कलमवाढ करण्यात आली आहे. अटक आरोपींना पोलिसांनी पकडल्याचे माहिती मिळाल्याने आरोपींचे दोन्ही साथीदार हे आपले फोन बंद करून फरार झाले
होते. त्यांचेबाबत तांत्रिक व पांरपारिक तपास करत साथीदार दोन्ही आरोपी
१) अमन आजिम शेख वय २० वर्ष रा. आर्य समाज चौक, पुनम फर्निचर जवळ, रामकृष्ण नगर, पिंपरी पुणे
२) गणेश भुंगा कांबळे वय २१ वर्ष रा. पाचपिर चौक, पंचनाथ कॉलनी, काळेवाडी पुणे मुळ रा. भाटनगर, रेल्वे लाईन जवळ, निराधारनगर, शंकराचे मंदीराचे बाजुला पिंपरी
यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक ४ आरोपी यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करित गुन्हयात जबरी चोरी केलेली एकुण रोख रक्कम १०,४०,०००/- रुपये व गुन्हा करणेसाठी वापरलेली होंडा शाईन मो.सा.नं.एमएच.१४. जेएफ. २७५२ असा एकुण १९,१०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींचे तपासादरम्यान माहीती मिळाली की,
अमन आजिम शेख व गणेश भुंगा कांबळे हे
१) निगडी पोलिस स्टेशन गु.रजि. नं. ५९७/२०२३ भादविक ३७९
२) सांगवी पोलिस स्टेशन गु.रजि. नं. ५३७ / २०२३ भादविक ३७९
३) सांगवी पोलीस स्टेशन गु.रजि. नं. ५०२/२०२३ भादविक ३७९ या ०३ गुन्हयात फरार आहेत. तसेच
गणेश कांबळे याचेवर यापुर्वी एकुण १० गुन्हे, अमन शेख याचेवर ०३ गुन्हे, तसेच यांचेवर बरेच गुन्हे दाखल आहेत
आदित्य घायतडक याचेवर ०१ गुन्हा दाखल आहे. अशा प्रकारे अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन कट कारस्थान करुन त्यांनी केलेला गुन्हा वाकड पोलिस स्टेशन तपास पथकाने उघड केला असुन चारही आरोपींना दि. २५/१०/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे,पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॅा. संजय शिंदे सह. पोलिस आयुक्त, . वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, . डॉ. विशाल हिरे, सहा. पोलिस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली . गणेश जवादवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक, . विठ्ठल साळुंखे पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सफौ बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, स्वप्निल खेतले, . दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, वंदु गिरे, पोना. प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, पोशि. अजय फल्ले, भास्कर भारती,स्वप्निल लोखंडे, . सौदागर लामतुरे, . कौंतेय खराडे, .विनायक घारगे, रमेश खेडकर,सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.