
बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी केली अटक…
बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी केली अटक…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली. ही घटना (दि.७ मे) रोजी पहाटे तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करत असताना हे आरोपी तळेगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. तिघांसह एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आसीफ सलीम शेख (वय २०), रत्नदीप रेवनसिध्द कदम (वय १९), अमन कमीनदंर यादव (वय १९, तिघेही रा. कोंढवा खुर्द, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात लोक वसाहत असुन विविध बँकेचे ए.टी.एम. सेंटर आहेत. अज्ञात आरोपी यांनी (दि.०६मे) रोजी १८:४५ वा. ते (दि.०७मे) रोजी ०५:३० वाजताचे दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्राचे ए.टी.एम. तळेगाव दाभाडे, ता.मावळ, पुणे येथील ए.टी.एम. फोडुन त्याचे नुकसान केलेले होते व चोरीचा प्रयत्न केलेला होता. त्या प्रमाणे पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी व पथक हे सदर घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज गोळा करून गोपनीय बातमीदार व तांत्रिक तपासाचा वापर करून ए.टी. एम. फोडुन चोरी करणारे आरोपीचा शोध घेत होते.

या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.१६मे) रोजी तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, स.फौ. दिलीप कदम, पो.हवा.क. किशोर गिरीगोसावी, पोलीस हवा. मुरलीधर कोकतरे, पोलीस अंमलदार आनंद मोहीते, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, प्रितम सानप, हर्षद कदम असे गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी आणि पथकास माहीती मिळाली की, १) आसीफ सलीम शेख वय (२० वर्षे) रा.गल्ली नं.०१, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे २) रत्नदीप रेवनसिध्द कदम (वय १९ वर्षे), रा.गल्ली नं.२३, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे ३) अमन कमीनदंर यादव (वय १९ वर्षे), रा.गल्ली नं. ०१, येवलेवाडी, कोंढवा खुर्द, पुणे ४) विधी संघर्षग्रस्त बालक हे तळेगाव दाभाडे परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन आरोपींना तपास पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर सदर आरोपी यांना ताब्यात घेतल्यानंतर सदर आरोपींकडे पोलीस कोठडी दरम्यान अतिशय कौशल्यपुर्ण तपास केला असता नमुद आरोपी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे दाखल गु.र.क. २८१/२०२४ कलम ४६१,४२७,५११ भादवि आणि देहुरोड पोलीस ठाणे दाखल गु.र.क. २६०/२०२४ कलम ४६१,३८०,५११,४२७ भादवि असे ०२ गुन्हे केल्याची कबुली तपासा दरम्यान दिलेली आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय शिताफीने व कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी १) आसीफ सलीम शेख (वय २० वर्षे) रा.गल्ली नं.०१, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे २) रत्नदीप रेवनसिध्द कदम (वय १९ वर्षे), रा.गल्ली नं.२३, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे ३) अमन कमीनदंर यादव (वय १९ वर्षे), रा.गल्ली नं.०१, येवलेवाडी, कोंढवा खुर्द, पुणे ४) विधी संघर्षग्रस्त बालक – आयान आझाद खान (वय १७ वर्षे), रा. गल्ली नं.०१, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे यांच्याकडुन गुन्हयाची उकल करून घेतलेली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नवार, पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, स.फौ. दिलीप कदम, पो.हवा. किशोर गिरीगोसावी, पोलीस हवा.मुरलीधर कोकतरे, पोलीस अंमलदार आनंद मोहीते, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, प्रितम सानप, हर्षद कदम यांनी केलेली आहे.


