
चोरीच्या १५ मोटारसायकलसह दोन आरोपींना अटक…
चोरीच्या १५ मोटारसायकलसह दोन आरोपींना अटक
पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत होती. या मुळे कुठे तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होत होता. म्हणून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अतंर्गत चाकण पोलिस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तिंकडुन मोटारसायकल चोरी होत असल्याने विनयकुमार चौबे पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, सह पोलिस आयुक्त, सजंय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-३ संदिप डोईफोडे, सहा.पोलिस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांनी मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत अशोक कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चाकण पोलिस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या.


म्हणुन त्या अनुषंगाने अशोक कदम, वरीष्ठ पोलिस निरीक्षक चाकण पोलिस स्टेशन यांनी वाहन चोरांकडुन चाकण पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हे उघड करण्यासाठी वाहन चोरीचे गुन्ह्यासाठी विशेष पथकाची नेमणुक केली. सपोनि प्रसंन्न जन्हाड व विक्रम गायकवाड तसेच अंमलदार हे वाहन चोरीच्या घटनास्थळावर भेट देऊन सदर परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले

तसेच सदर परीसरामध्ये मोबाईलचा तांत्रिक विश्लेषण करून घटनास्थळी दिसलेल्या इसमांबाबत माहिती प्राप्त केली. दि. २२ डिसेंबर रोजी अशोक कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चाकण पोलिस स्टेशन यांच्या प्रत्यक्ष मार्गदशनाखाली सपोनि प्रसन्न जराड, पोहवा संदिप सोनवणे, पोशि संदिप गंगावणे, नापोशि निखील शेटे, पोशि सुनिल भागवत यांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांचे तांत्रीक विश्लेषण व १०० च्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासले व चाकण पोलिस स्टेशन हददीत मोटार सायकल चोरी करणारे योगेश तुकाराम देवकर व दत्तात्रय गंगाराम गाडेबैल दोन्ही रा.कवठे यमाई ता.शिरूर, जि. पुणे यांना निष्पंन्न केले. त्या अनुषंगाने वरील तपास पथकाने कवठे यमाई येथे सापळा रचुन नमुद इसमांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्या नतंर त्यांचेकडे अतिशय कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपी दत्तात्रय गंगाराम गाडेबैल व योगेश तुकाराम देवकर यांनी या पुर्वी वेळोवेळी चाकण पोलिस ठाणे व इतर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकुण १५ मोटार सायकली काढुन दिलेल्या असुन त्या गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

चाकण पोलिस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी अतिशय शिताफिने व कौशल्यपुर्ण तपास करून अटक आरोपी १) योगेश तुकाराम देवकर (वय ३० वर्षे), २) दत्तात्रय गंगाराम गाडेबैल (वय २६ वर्षे), दोन्ही रा.कवठे यमाई ता.शिरूर, जि.पुणे यांना चाकण पोलिस स्टेशन येथे अटक करण्यात आलेली असुन त्यांचेकडुन ८,००,०००/- रूपये किमतीच्या एकुण १५ मोटारसायकल जप्त करून मोटारसायकल चोरीच्या एकुण ०९ गुन्हयांची उकल केलेली असून इतर वाहन मालकांची माहिती घेवुन तपास करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त, विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त, सजंय शिंदे, अपर पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-३ संदिप डोईफोडे, सहा. पोलिस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम, पोलिस निरीक्षक गुन्हे युनुस मुलाणी तसेच सपोनि प्रसन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायकवाड, पो.हवा संदिप सोनवणे, राजु जाधव, हनुमंत कांबळे, नापोशि निखील शेटे, पोशि नितीन गुंजाळ, सुनिल भागवत, संदिप गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी, विवेक सानप, प्रतिक चव्हाण, अरूण शिंदे, महादेव बिक्कड, मपोशि माधुरी कचाटे यांनी केलेली आहे.


