
नारायण पेठेत झेड ब्रीज च्या दिशेने येणाऱ्या कारचालकाने एकाला चिरडले चार जखमी…
पुणे : नारायण पेठ पोलिस चौकीकडून एक चारचाकी वाहन झेड ब्रिजच्या दिशेने येऊन या कारचालकाने दारुच्या नशेत रिक्षांना धडक दिली आणि काही पादचाऱ्यांना उडवले त्यात एकाचा म्रुत्य तर चार जन जखमी झाल्याची माहीती आहे पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती झाली असून एका कारचालकाने दारूच्या नशेत अनेक वाहनांना उडवले. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच
मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. नारायण पेठ पोलीस चौकीकडून चारचाकी वाहन झेड ब्रिजच्या दिशेने आलेल्या या कारचालकाने दोन रिक्षांना धडक दिली आणि काही पादचाऱ्यांना उडवले. उमेश हनुमंत वाघमारे (वय 48 ) असे या कार चालकाचे नाव आहे. तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44 )असे गाडीमालकाचे नाव आहे. पुण्यातील झेड ब्रिज नारायण पेठेतील रस्त्याला जिथे येऊन मिळतो तिथे ही घटना घडली. दारुच्या
नशेत असलेल्या कारचालकाने धडक दिल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक आणि काही वाहनचालक जखमी झालेत. दारूच्या नशेत मद्यधुंद असलेल्या कारचालकाला लोकांनी आधी चोप दिला आणि नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पुण्यात घडलेल्या या घटनेने 2012 सालच्या संतोष
माने प्रकरणाची आठवण करून दिली हे मात्र नक्कीच
पुढील तपास पोलिस करताय




