
तीन वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड
तीन वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड…
पुणे (सायली भोंडे) – पुणे शहरासह जिल्ह्यात घरफोड्या, दरोडा, जबरी चोरी यां सारख्या गुन्ह्यांमध्ये गेले तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या गुन्हेगाराला शिताफीने पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश मिळाले आहे. स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १४४/२०२३ भा.द.वि कलम ४५७, ३८० मधील फिर्यादी यांचे घराच्या दरवाजाची कडी उघडुन घरातील लोखंडी कपाट उचकटुन त्या मधील सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी करुन चोरुन नेले होते. अशी तक्रार फिर्यादी ने दिली होती त्या नुसार दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.


दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात चोरटयाचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलिस अंमलदार सुजय पवार व सोमनाथ कांबळे यांनी दाखल गुन्हयाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीचा काही एक सुगावा लागत नव्हता सदर आरोपीबाबत सलग ३ ते ४ महिने तपास केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तपासा अंती सदर गुन्हा करणारा आरोपी हा पापासिंग दयालसिंग दुधानी असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन तो कायमस्वरुपी स्वतः जवळ धारदार हत्यार बाळगुन घरफोडी व जबरी चोरी करणारा असुन तो गेले ०३ वर्षापासुन अनेक गुन्हयांमध्ये फरार आरोपी होता, तो कोणाच्याच हाती लागत नव्हता.

या बाबत अधिक माहिती अशी की, सदर आरोपी हा मु.पो. कान्हेफाटा आंबेवाडी, ता.वडगाव मावळ, जि.पुणे येथे राहत आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली, तपास पथकातील पोलिस अंमलदार सुजय पवार व सोमनाथ कांबळे यांनी सदर बातमीबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांना माहिती दिली नंतर वरिष्ठांनी सदर बातमीबाबत पोलिस उपआयुक्त परिमंडळ ०२ पुणे शहर व सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर यांना माहिती दिली असता वरिष्ठांनी मार्गदर्शन व योग्य सुचना देऊन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यावरुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी सदर आरोपीस पकडण्यासाठी एक पथक तयार करुन सदर तपास पथकास योग्य सुचना व मार्गदर्शन करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले, त्यावरुन तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोहवा सुजय पवार, सोमनाथ कांबळे, शिवदत्त गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, अनिस शेख, दिपक खेंदाड, मपोअं स्मिता सिताप व शितल गायकवाड यांचे पथक तयार करुन सदर पथकासह कान्हेफाटा आंबेवाडी येथे आरोपी पापासिंग दुधानी यांच्या राहत्या घरावर रात्रभर पाळत ठेवुन पहाटेच्या सुमारास घराला घेराव घालुन अचानकपणे धाड मारली असता आरोपी पापासिंग दुधानी जिन्यावरुन उडी टाकुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना स्टाफचे मदतीने त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याचेजवळ असणारे घातक हत्यार ताब्यात घेवुन त्यास पकडण्यात आले. तद्नंतर सदर आरोपीस दाखल गुन्हयात अटक करुन पोलिस कोठडी दरम्यान त्याचेकडे तपास पथकातील पोहवा शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, फिरोज शेख व रमेश चव्हाण यांनी कसुन तपास केला असता त्याने दाखल गुन्हयातील चोरी केलेले व स्वारगेट परिसरामध्ये चोरी केलेले सोन्याचे दागिने लोणावळा येथील सोनार दुकानदार यास विक्री केले असल्याचे सांगितल्याने आरोपीचे निवेदन पंचनाम्यावरुन सदर ठिकाणी जावुन मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी सदर आरोपीकडुन तपासादरम्यान स्वारगेट पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयातील एकुण १५४ ग्रॅम (१५ तोळे ४ ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने, घर फोडीसाठी लागणारी हत्यारे, सोन्याचे वजन मोजन्याची इलेक्ट्रीक मशीन, गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण ०८,६५,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन स्वारगेट पोलीस स्टेशनकडील एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अशा प्रकारे सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, नारायण शिरगांवकर, सहा.पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, “पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोशि सुजय पवार, सोमनाथ कांबळे, शिवदत्त गायकवाड, फिरोज शेख, अनिस शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, दिपक खंदाड, मनापोशि शितल गायकवाड, स्मिता सिताप यांनी एकत्र मिळून केली आहे.


