
पुण्यात टिळकरस्त्यावर कोयता गॅंगचा उच्छाद,तिघे अटकेत..
पुणे(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पुणे शहर व परिसरात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोयते विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीसुध्दा ऐन दिवाळीत कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे पुण्यातील टिळक रस्त्यावर कपडे खरेदीसाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची
धक्कादायक घटना नुकतीच घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पोलिसांनी कोयता गँगच्या कारवाया रोखण्यासाठी शहराच्या मध्यवस्तीतील कोयते विक्री करणाऱ्या ठिकाणांवरून कोयते जप्त केले तरीपण
अक्षय मलाप्पा शिंगे (वय २५, रा. महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती)


असे कोयता गँगच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शिंगे याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अक्षय, त्याचे मित्र करण धिवार, मुज्जमीर शेख यांच्यासोबत दिवाळीची खरेदी करण्यासाठी टिळक रस्त्यावरील वस्त्र दालनात आले होते. त्यावेळी फुटपाथवरुन आलेल्या तिघांनी शिंगे याच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्याचे नेमके कारण स्पष्टे झाले नाही. या घटनेचा अधिक तपास
सहायक पोलीस निरीक्षक नानेकर करत आहेत.



