मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार कुचेकर भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक….

भारती विद्यापीठ (सायली भोंडे) – भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी गुंगारा देत पोलीसांनी लावलेल्या सापळयातुन सारखा निसटत होता. माञ शेवटी त्या फरार आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.





भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंवर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम ३०७, ३८५, ३८७, ३२४,४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ (२), सह क्रि. लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७, आर्म ॲक्ट कलम ४(२५), म.पो अधि ३७(१) सह १३५, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधि. २०१५ कलम ८३ (२) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii). ३ (२), ३ (४) या गुन्हयातील पाहीजे आरोपी तुषार कृष्णा कुचेकर, (वय १९ वर्षे), रा.विठ्ठल रुक्मीणी मंदीरा शेजारी, शनिनगर, जांभुळवाडी, पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन मिळुन येत नव्हता. त्याचा भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे शोध घेताना तो वारंवार पोलिसांनी लावलेल्या सापळयातुन निसटत होता. आरोपी तुषार कृष्णा कुचेकर, (वय १९ वर्षे), रा.विठ्ठल रुक्मीणी मंदीराशेजारी, शनिनगर, जांभुळवाडी, पुणे याचा भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार गुप्त बातमीदारांचे नेटवर्क सक्रीय करुन तांत्रिक विश्लेषणावरुन शोध घेत असताना पोलिस अंमलदार चेतन गोरे, अभिजीत जाधव यांना नमुद आरोपी हा भुमकर ब्रिज, समर्थ सोसायटी, दुसरा मजला, आंबेगाव, पुणे येथे त्याचे बहीणीस भेटण्यासाठी आला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपीताचा शोध घेतला तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी गुन्हयाचे तपासी अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी सदर आरोपीला नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे.



अशा प्रकारे सदरची कामगिरी ही रितेशकुमार पोलिस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे (अतिरीक्त कार्यभार सह पोलिस आयुक्त, पुणे शहर), प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार चेतन गोरे, अभिजीत जाधव, सचिन सरपाले, शैलेश साठे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!